TRENDING:

वरुण धवनची 21 महिन्यांची लेक गंभीर आजाराने ग्रस्त, चालणं-फिरणंही झालेलं मुश्किल, अभिनेत्याचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
Varun Dhawan : वरुणची २१ महिन्यांची मुलगी लारा धवन गंभीर शारीरिक व्याधीने ग्रस्त असून तिला नीट चालणं आणि धावणंही कठीण झालं होतं.
advertisement
1/7
वरुण धवनची 21 महिन्यांची लेक गंभीर आजाराने ग्रस्त, चालणं-फिरणंही झालेलं मुश्किल
बॉलिवूडचा हँडसम हंक वरुण धवन त्याच्या कॉमिक सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. अनेक फिल्म्समध्ये त्याने विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. सतत हसतमुख राहणाऱ्या वरुणने नुकतंच त्याच्या आयुष्यातील अतिशय दुःखद घटनेचा खुलासा केला आहे.
advertisement
2/7
वरुण धवनने २०२१ साली त्याची जुनी मैत्रीण नताशा दलालशी अगदी थाटामाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनी २०२४ साली त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं होतं. मात्र, वरुण आणि नताशा यांची लाडकी लेक लारा एका अशा गंभीर आजाराशी लढा देत आहे, ज्याबद्दल कोणालाच माहीत नाही.
advertisement
3/7
नुकतंच वरुणने लाराच्या आजाराविषयी मोठा खुलासा केला. वरुणची २१ महिन्यांची मुलगी लारा धवन DDH या गंभीर शारीरिक व्याधीने ग्रस्त असून तिला नीट चालणं आणि धावणंही कठीण झालं होतं. जेव्हा लारा दीड वर्षांची होती, तेव्हा त्यांना पहिल्यांदा या आजाराबद्दल समजलं.
advertisement
4/7
वरुणने सांगितलं की, त्याची मुलगी लाराला DDH म्हणजेच 'डेव्हलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ हिप्स' हा आजार आहे. या आजारात हिप जॉईंट आपल्या जागेवरून सरकतो किंवा तो नीट विकसित झालेला नसतो. यामुळे लहान मुलांना चालताना त्रास होतो, पाय लंगडतो आणि भविष्यात लवकर आर्थरायटिस किंवा स्लिप डिस्कचा धोका निर्माण होतो.
advertisement
5/7
वरुणने सांगितल्यानुसार, परदेशात या आजारावर प्रभावी उपचार होतात. भारत आणि इतर देशांतील उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या असून लारावर कोणतीही सर्जरी करण्याची गरज पडली नाही. पण तिच्यासाठी एक विशिष्ट प्रोसीजर करावी लागली.
advertisement
6/7
लाराचे हिप जॉईंट्स पुन्हा योग्य जागी बसवण्यासाठी तिला स्पायका कास्टमध्ये म्हणजेच कंबरेपासून पायापर्यंतचा प्लास्टरमध्ये जवळपास अडीच महिने राहावं लागलं. इतक्या लहान चिमुरडीला ॲनेस्थेसिया देऊन त्या फ्रॅक्चरच्या कास्टमध्ये ठेवणं बाप म्हणून वरुणसाठी अतिशय कठीण होतं. मात्र आता सुदैवाने हे कास्ट काढण्यात आलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, वरुणची लेक सध्या या आजाराच्या धोक्यातून बाहेर असली तरीही एक बाप म्हणून वरुणने सर्व पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. वरुण म्हणाला की, तुमच्या मुलांच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवा. काही वेगळं जाणवलं, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. सुरुवातीच्या काळातच आजार ओळखले, तर त्यावर योग्य उपचार करून आजार बरा होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वरुण धवनची 21 महिन्यांची लेक गंभीर आजाराने ग्रस्त, चालणं-फिरणंही झालेलं मुश्किल, अभिनेत्याचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल