'विठु माऊली' फेम कलाकारांनी बांधली लग्नगाठ; रिलनंतर आता रिअल लाइफमध्येही पती-पत्नी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Atharva Karve Sakshi Mahajan Wedding : ऑनस्क्रिन पती-पत्नीची भूमिका साकारणारा अभिनेता अथर्व कर्वे आणि अभिनेत्री साक्षी महाजन यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे.
advertisement
1/5

विठु माऊली या मालिकेतील पती-पत्नीची भूमिका साकारणारे मराठी सेलिब्रिटी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार बनले आहेत. दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
2/5
अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. दोघांच्याही लग्नाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.
advertisement
3/5
अथर्व कर्वे विठु माऊलीत पुंडलिकची भूमिका साकारत आहे, तर साक्षी महाजन त्याची पत्नी कुसुमच्या भूमिकेत आहेत.
advertisement
4/5
अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली.
advertisement
5/5
तर साक्षी महाजन 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकली. याआधी तिने 'उदे गं अंबे' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका साकारली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'विठु माऊली' फेम कलाकारांनी बांधली लग्नगाठ; रिलनंतर आता रिअल लाइफमध्येही पती-पत्नी