TRENDING:

Aayush Sanjeev: कोण आहे आयुष संजीव, ज्याने दिले Bigg Boss Marathi 6 मध्ये येण्याचे संकेत? आहे सलमान खानशी खास नातं

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: अशा एका अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे, ज्याने स्वतः घरात कन्फर्म स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्याचा संघर्षमय प्रवास पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.
advertisement
1/9
कोण आहे आयुष संजीव, ज्याने दिले Bigg Boss Marathi 6 मध्ये येण्याचे संकेत?
मुंबई: ज्या शोची अख्खा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय, त्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा पडदा आता अवघ्या काही दिवसांतच उघडणार आहे. ११ जानेवारी २०२६ ही तारीख जवळ येत असताना, दररोज नवनवीन नावांची चर्चा रंगत आहे.
advertisement
2/9
त्यातच अशा एका अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे, ज्याने स्वतः घरात कन्फर्म स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्याचा संघर्षमय प्रवास पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.
advertisement
3/9
'बॉस माझी लाडाची' फेम अभिनेता आयुष संजीव आता बिग बॉसच्या घरात कन्फर्म स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आयुषने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्याने चाहत्यांची खात्री पटवली आहे की तो आता थेट बिग बॉसच्या घरात जाणार आहे.
advertisement
4/9
त्याने लिहिलंय, "मी काही काळासाठी इन्स्टाग्रामपासून विराम घेत आहे. यापुढचा प्रवास 'टीम आयुष संजीव' सांभाळेल. प्रवास थांबत नाहीये, फक्त त्याची दिशा थोडी बदलतेय."
advertisement
5/9
साधारणपणे बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सर्व स्पर्धक अशाच प्रकारची डिजिटल ब्रेकची पोस्ट टाकत असतात. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, "आता ट्रॉफी तुझीच!" अशा शुभेच्छा त्याला दिल्या जात आहेत.
advertisement
6/9
आयुष संजीवचा हा प्रवास खरोखरच एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने त्याच्या संघर्षाचा पाढा वाचला.
advertisement
7/9
आयुषने सांगितलं की, तो एकेकाळी इमॅजिकामध्ये कर्मचारी म्हणून काम करायचा. इतकंच नाही, तर हिंदी बिग बॉसच्या मंचावर तो सलमान खानच्या मागे एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून उभा होता.
advertisement
8/9
त्याने शेअर केलेल्या जुन्या फोटोंमध्ये तो टायगर श्रॉफ आणि प्रकाश राज यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या मागे गर्दीत उभा असलेला दिसतोय.
advertisement
9/9
ज्युनियर आर्टिस्ट, मॉब आर्टिस्ट आणि डान्सर म्हणून काम करणारा हा मुलगा आज स्वबळावर मुख्य नायकाची भूमिका गाजवून आता बिग बॉस मराठीच्या घरात दिमाखात प्रवेश करणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aayush Sanjeev: कोण आहे आयुष संजीव, ज्याने दिले Bigg Boss Marathi 6 मध्ये येण्याचे संकेत? आहे सलमान खानशी खास नातं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल