15 किलोचा कॉस्च्युम, आत लावाली लागायची ऑक्सिजनची नळी, 'धूप धूप' करणाऱ्या जादूच्या मागे नेमकं होतं कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कोई मिल गया सिनेमात जादूची भूमिका साकारणारा तो अभिनेता कोण होता? जादूच्या मागे नेमकं कोण होतं?
advertisement
1/8

ऋतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा सिनेमा अनेकांच्या बालपणीच्या आवडत्या सिनेमांपैकी एक असेल. या सिनेमातील 'जादू' तुम्हाला आठवतोय! धूप… धूप… म्हणणारा तो निळा एलियन. ज्याच्या निरागस डोळ्यांनी आणि जादूई शक्तींनी केवळ ऋतिक रोशनलाच नाही तर संपूर्ण भारताला वेड लावलं होतं.
advertisement
2/8
निळ्या रंगाचा हा एलियन म्हणजेच जादू कोण होता? धूप धूप करणाऱ्या जादूच्या मागे नेमकं कोण होतं माहितीये?
advertisement
3/8
निळ्या रंगाचा जादू साकारणं सोपं नव्हतं. ज्या अभिनेत्यानं हा जादू साकारला त्याचा जीव जाण्याची वेळ आली होती. कॉस्च्युमच्या आत त्याच्यासाठी ऑक्सिजन नळी लावण्यात आली होती. जादूच्या मागे असलेला कलाकार फार लोकांना माहिती आहे. अभिनेते इंद्रवदन पुरोहित असं त्यांचं नाव होतं. इंडस्ट्रीत त्यांना प्रेमानं छोटे उस्ताद म्हणायचे.
advertisement
4/8
इंद्रवदन यांना 'जादू'ची भूमिका साकारणं म्हणजे फक्त अभिनय नव्हता तर अक्षरशः शारीरिक आणि मानसिक कसोटी होती. त्या एलियन कॉस्च्युमचं वजन जवळपास 15 किलो होतं. या कॉस्च्युममध्ये श्वास घेणं कठीण जायचं. अनेकदा एका सीननंतर त्यांना थेट ऑक्सिजन द्यावा लागायचा.
advertisement
5/8
रबरी मुखवट्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. तरीही केवळ आवाज आणि सहकलाकारांच्या हालचालींच्या अंदाजावर त्यांनी चेहऱ्याचे भाव, हालचाली केल्या होत्या. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता, घामाघुम होत त्यांनी प्रेक्षकांना एक हसरा, निरागस 'जादू' दिला.
advertisement
6/8
इंद्रवदन पुरोहित केवळ जादूमुळे चर्चेत आले नाहीत. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. नागिनसारख्या जुन्या चित्रपटांपासून ते हॉलीवूडच्या लॉर्ड ऑफ द रिंग्सपर्यंत इंद्रवदन यांनी काम केलं होतं.
advertisement
7/8
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये त्यांनी दयाबेनच्या नातेवाईकाची भूमिका केली होती. बालवीरमध्ये 'डूबा-डूबा' या भूमिकेनंही प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
8/8
इंद्रवदन यांची शारिरीक उंची कमी असली तरी त्यांच्या कामानं त्यांनी यशाची मोठी उंची गाठली होती. आज या जगात नाहीत. 2014 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र आजही जेव्हा जेव्हा जादू समोर येतो तेव्हा इंद्रवदन यांची आठवण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
15 किलोचा कॉस्च्युम, आत लावाली लागायची ऑक्सिजनची नळी, 'धूप धूप' करणाऱ्या जादूच्या मागे नेमकं होतं कोण?