Jay-Mahi Divorce : 'कायदेशीर कारवाई करणार', जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर माही वीजने सोडलं मौन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jai Bhanushali-Mahi Vij Divorce : काही दिवसांपासून जय भानुशाली आणि माही विज लग्नाच्या १४ वर्षांनी वेगळे होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला. दरम्यान, आता स्वतः माहीने या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/8

गेल्या काही वर्षांमध्ये देशात घटस्फोट होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटी जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. अशातच काही दिवसांपासून हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल जय भानुशाली आणि माही विज लग्नाच्या १४ वर्षांनी वेगळे होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला. दरम्यान, आता स्वतः माहीने या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
advertisement
2/8
माही विज आणि जय भानुशाली यांच्या नात्यात काहीतरी गडबड सुरू असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. याचदरम्यान, एका इन्स्टाग्राम पेजने त्यांच्या घटस्फोटाची बातमी शेअर केली, ज्यामुळे खळबळ उडाली.
advertisement
3/8
या पोस्टमध्ये माही आणि जयचा फोटो वापरून लिहिले होते, "सगळं संपलं? १४ वर्षांच्या लग्नानंतर जय भानुशाली आणि माही विज घटस्फोटाच्या दिशेने जात आहेत. जुलै आणि ऑगस्ट २०२५ मध्ये घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या होतील आणि त्यांची तिन्ही मुले तारा, राजवीर आणि खुशी यांच्या कस्टडीवरही निर्णय झाला आहे."
advertisement
4/8
या बातमीला एका सूत्रानेही दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले होते. 'हिंदुस्तान टाइम्स'ला सूत्रांनी सांगितले होते की, दोघांनी वेगळे होण्यासाठी अर्ज केला आहे. आता ही बातमी वाचताच माही विजने तात्काळ यावर प्रतिक्रिया दिली. तिने थेट कमेंट बॉक्समध्ये जाऊन या खोट्या दाव्यांवर आक्षेप घेतला.
advertisement
5/8
माही विजने स्पष्टपणे लिहिले, "खोट्या गोष्टी पोस्ट करू नका. मी याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे." तिच्या या प्रतिक्रियेमुळे घटस्फोटाच्या अफवांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
advertisement
6/8
माही आणि जयची जोडी टीव्हीवरील सर्वात आवडत्या कपल्सपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला आता १४ वर्षे झाली आहेत. त्यांनी २०११ मध्ये गुपचूप लग्न केले होते आणि नंतर २०१४ मध्ये लास वेगासमध्ये पुन्हा एकदा लग्न केले.
advertisement
7/8
२०१९ मध्ये माही आणि जय हे तारा नावाच्या मुलीचे पालक बनले. याव्यतिरिक्त, त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषणही केले आहे.
advertisement
8/8
या जोडप्याला शेवटचे त्यांची मुलगी ताराच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र पाहिले गेले होते. त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा नसल्याचे माहीने स्पष्ट केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jay-Mahi Divorce : 'कायदेशीर कारवाई करणार', जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर माही वीजने सोडलं मौन