TRENDING:

कायद्याने गुन्हा तरी... इतका फालतूपणा, काय काय दाखवणार! Marathi Serial रिलीजआधीच वादात; प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त

Last Updated:
Marathi Serial : नुकताच या मराठी मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यातील एक सीन पाहून प्रेक्षकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ही मालिका रिलीजआधीच वादात सापडली.
advertisement
1/7
कायद्याने गुन्हा तरी... इतका फालतूपणा, काय काय दाखवणार! मराठी मालिका रिलीजआधीच वादात; प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त
वेगवेगळ्या मराठी चॅनेल्सवर नवीन मालिका सुरू झाल्या आहेत आणि काही लवकरच येणार आहेत. त्यांचे प्रोमो रिलीज करत कधीपासून सुरू होणार याची तारीख आणि किती वाजता दाखवणार ती वेळ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये या नव्या मालिकेसाठी उत्साह आहे. पण एका मालिकेचा प्रोमो पाहून मात्र प्रेक्षकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
2/7
कोणतीही मालिका असो सामान्यपणे त्याची सुरुवात तशी हॅप्पी असते. नंतर हळुहळु जशी ही मालिका पुढे जाते, तसतशा त्यात धक्कादायक गोष्टी घडतात. पण या मालिकेची सुरुवातच धक्कादायक आहे. या मराठी मालिकेचा प्रोमो इतका शॉकिंग आहे की, प्रेक्षकही संतप्त झाले आहे.
advertisement
3/7
आता असं या मालिकेच्या प्रोमोत काय दाखवण्यात आलं आहे आणि ही मालिका कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मालिकेच्या सुरुवातीच्या प्रोमोत मालिकेचा हिरो दारूच्या नशेत आरशावर आपटून आपलं डोकं फोडून घेताना दिसतो. तर दुसरीकडे मालिकेची हिरोईन फुटलेल्या आरशात हसत टिकली लावताना दिसते.
advertisement
4/7
मालिकेचा पुढचा प्रोमो तर शॉकिंग. ज्याची सुरुवात हॅप्पी पण शेवट भयानक आहे. प्रोमोच्या सुरुवातीला दोघं जण रिक्षातून पत्रिका वाटायला जाताना दिसता. मधेच भयानक अपघात, त्यात दोघांचा मृत्यू आणि शेवटी या दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार दाखवण्यात आले आहेत.
advertisement
5/7
यावेळी दोन तरुणींचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. ज्यात एक म्हणजे मालिकेची मुख्य नायिका जिच्यात प्रेमाची ज्योत पेटलेली दाखवण्यात आली आहे, तर तिची सहकालाकार असलेली नायिका सूडाच्या आगीने पेटून उठलेली दाखवली आहे.
advertisement
6/7
या मालिकेचा प्रोमो पाहून त्यावर प्रेक्षक कमेंट करत आहेत. प्रोमोमध्ये एवढा फालतूपणा दाखवला आहे. तर मालिकेमध्ये काय काय दाखवणार तुम्ही. दारू पिऊन गाडी चालवणं कायद्याने गुन्हा आहे तरी मालिकेतला एक हिरो निरपराध लोकांना उडवून सरळ निघून जातो हे नाही पटलं, अशी कमेंट यावर एका युझरने केली आहे.
advertisement
7/7
झी मराठीवरील ही मालिका. जी 13 एप्रिलपासून रात्री 8 वाजता सुरू दाखवली जाणार आहे. दीपज्योती असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री पूर्वा कौशिक आहेत. प्रसाद दीपच्या तर पूर्वा ज्योतीच्या भूमिकेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कायद्याने गुन्हा तरी... इतका फालतूपणा, काय काय दाखवणार! Marathi Serial रिलीजआधीच वादात; प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल