TRENDING:

Zubeen Garg Death : झुबीन गर्गच्या अंत्यदर्शनासाठी आसाममध्ये जनसागर उसळला; पाहा PHOTO

Last Updated:
Zubeen Garg Death : आसामचा लोकप्रिय गायक झुबीन गर्गच्या अंत्यदर्शनासाठी आसाममध्ये चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेलं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/8
झुबीन गर्गच्या अंत्यदर्शनासाठी आसाममध्ये जनसागर उसळला; पाहा PHOTO
'या अली' या गाण्याने देशाला वेड लावणारे लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांच्या निधनाने संपूर्ण आसामवर दु:खाची लाट पसरली आहे.
advertisement
2/8
सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात झुबिनने आपला जीव गमावला. त्याच्या निधनामुळे आसाम सरकारने 20 ते 22 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर केला आहे.
advertisement
3/8
झुबिन यांचे पार्थिव आता गुवाहाटीमधील काहिलीपारा येथील त्यांच्या निवासस्थानाकडे नेले जात आहे.
advertisement
4/8
हजारो लोक रस्त्यावर उतरून झुबिन यांच्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत, तर लाखो लोक त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी होत आहेत.
advertisement
5/8
झुबिन गर्ग यांचे पार्थिव सरुसुजाई स्टेडियममध्ये ठेवले जाणार आहे. जेणेकरून आसामकरांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल.
advertisement
6/8
झुबीन गर्ग यांचे निधन शनिवारी सिंगापूरमध्ये झाले. त्यांचे पार्थिव रविवारी दिल्लीला आणले गेले, त्यानंतर एअर इंडियाच्या फ्लाइटने सकाळी सुमारे 7 वाजता गुवाहाटीमध्ये पोहोचवले गेले.
advertisement
7/8
झुबीन गर्गचं पार्थिव गुवाहाटीला पोहोचण्याआधीच एअरपोर्टवर जनसागर लोटला होता. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक चाहते झुबीन गर्गची लोकप्रिय गाणी गात, गिटार वाजवताना दिसून आले.
advertisement
8/8
झुबीनचं ‘या अली’ हे गाणं तुफान गाजलं होतं. या गाण्यामुळे त्याला संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Zubeen Garg Death : झुबीन गर्गच्या अंत्यदर्शनासाठी आसाममध्ये जनसागर उसळला; पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल