Dr. Hema Sane: 65 वर्षे विजेशिवाय राहिल्या! कसा होता वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचा जीवनप्रवास? Photo
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Dr. Hema Sane: वनस्पतीशास्त्रातील प्रसिद्ध नावं असलेल्या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी डॉ. हेमा साने (वय 85 वर्षे) यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
advertisement
1/7

डॉ. हेमा साने यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वनस्पती, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी वाहून घेतलं होतं. त्यांनी गरवारे महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून अनेक वर्षे अध्यापन केलं. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, संवेदनशीलता आणि शास्त्रीय दृष्टिकोन जागृत करण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या.
advertisement
2/7
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी वनस्पतीशास्त्रातील विविध शाखांमध्ये प्रगत झाले. लेखन आणि संशोधनातही डॉ. साने यांचा मोठा वाटा होता. त्यांनी वनस्पतींवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातून अनेक अभ्यासक, संशोधक तसेच सामान्य वाचकांना निसर्ग आणि वनस्पतींच्या गूढ जगाची ओळख झाली.
advertisement
3/7
शास्त्रीय माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडणे, हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांना विद्यार्थी वर्गासह पर्यावरणप्रेमी व सामान्य वाचकांनीही मोठा प्रतिसाद दिला. पर्यावरण संवर्धन, वनस्पतींचं संशोधन आणि संवर्धन, तसेच पुढील पिढ्यांना पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संदेश देणे, हे त्यांच्या आयुष्यचं ध्येय होतं.
advertisement
4/7
साधेपणा हा देखील त्यांच्या आयुष्याचा एक पैलू होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल उपकरणांशिवाय दिवस काढणंही कठीण आहे. मात्र, डॉ. हेमा साने यांनी 1960 पासून विजेचा वापरच केला नाही.
advertisement
5/7
त्यांनी पुण्यातील तांबडी जोगेश्वरी जवळील एका जुन्या वाड्यात आयुष्य व्यतीत केलं. तेथील वातावरण पूर्णपणे निसर्गस्नेही होतं. त्यांच्यासोबत नेहमीच प्राणी-पक्ष्यांचा वावर असे. चार मांजरं, एक मुंगूस, एक घुबड तसेच भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या असे पक्षी त्यांच्या सहवासात होते.
advertisement
6/7
त्यांच्या निवासस्थानी माणूस आणि निसर्ग यांचं खरं सहजीवन अनुभवायला मिळत असे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. पर्यावरणाशी नाळ जुळवून साधेपणानं जगणं, हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आणि वनस्पतीशास्त्राचा एक मोठा वारसा हरपला आहे.
advertisement
7/7
डॉ. हेमा साने यांचं योगदान लक्षात घेता त्यांना वनस्पतीशास्त्राचा एनसायक्लोपिडिया म्हटलं जात होतं. त्यांच्या निधनाने पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यावरण, वनस्पतीशास्त्र आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Dr. Hema Sane: 65 वर्षे विजेशिवाय राहिल्या! कसा होता वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचा जीवनप्रवास? Photo