तिसरं महायुद्ध झालंच, तर जगातील कोणते देश राहण्यासाठी सुरक्षित आहेत? 90% लोकांना माहीत नाही याचं उत्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
ईराण-इस्त्राईल युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती जगभरात वाढत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक शांतता निर्देशांकात अव्वल स्थानी असलेले हे देश महायुद्धादरम्यान सर्वात सुरक्षित ठिकाणे मानली जात आहेत. सविस्तर माहिती जाणून घ्या...
advertisement
1/14

जगात ईराण-इस्त्राईल संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिकेने ईराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर तात्पुरता शांतता करारही रद्द झाला आहे. त्यामुळे जग विचार करतंय -जर हे युद्ध जगभर पसरलं, तर सुरक्षित कुठे राहता येईल? सर्वप्रथम उल्लेख केलेल्या देशांची माहिती जाणून घ्या...
advertisement
2/14
आइसलँड (Iceland) : ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 17 वर्षांपासून आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. भू-राजकीयदृष्ट्या तटस्थ असलेला हा देश कधीही कोणत्याही युद्धात सामील झालेला नाही. तसेच, पॅसिफिक महासागराच्या मधोमध असल्यामुळे तो युद्धखोर शक्तींसाठी लक्ष्य नाही.
advertisement
3/14
न्यूझीलंड (New Zealand) : शांतता निर्देशांकात न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. हा देश तटस्थ धोरण अवलंबतो आणि भौगोलिकदृष्ट्या खूप दूर असल्यामुळे सुरक्षित आहे. निसर्गाने परिपूर्ण असल्यामुळे इथे युद्धाचा मोठा धोका नाही.
advertisement
4/14
स्वित्झर्लंड (Switzerland) : स्वित्झर्लंडने दीर्घकाळापासून तटस्थता जपली आहे. खोल डोंगर, खडबडीत भूभाग आणि नागरिकांसाठी असलेली आश्रयस्थानं यांनी युद्धाच्या काळात त्याची सुरक्षा वाढवली आहे. शांतता निर्देशांकात त्याचे सहावे स्थान यावरूनच दिसून येते.
advertisement
5/14
ग्रीनलँड (Greenland) : ग्रीनलँड राजकीयदृष्ट्या तटस्थ आणि कमी लोकसंख्या (सुमारे 56000) असलेला देश आहे. हा अविकसित भागात असल्यामुळे मोठ्या युद्धात लक्ष्य होण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
6/14
इंडोनेशिया (Indonesia) : इंडोनेशिया स्वतंत्र आणि खुले परराष्ट्र धोरण अवलंबतो. मोठ्या लष्करी संघर्षांमध्ये स्वतःला सामील न केल्यामुळे त्याची सुरक्षा वाढते.
advertisement
7/14
तुवालू (Tuvalu) : तुवालू हा पॅसिफिक महासागरातील एक छोटा आणि दुर्गम बेट आहे, ज्याची लोकसंख्या फक्त 11000 आहे. लष्करी तळ म्हणून त्याचा वापर करणे कठीण असल्यामुळे तो लक्ष्य होण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
8/14
अर्जेंटिना (Argentina) : अर्जेंटिना गहूसह अन्न उत्पादनात आत्मनिर्भर देश आहे. अणुयुद्धाच्या काळात अन्नसंकटाची शक्यता नाही.
advertisement
9/14
भूतान (Bhutan) : 1971 पासून तटस्थ असलेला भूतान, डोंगराळ देश असल्यामुळे नैसर्गिक अडथळ्यांनी सुरक्षित आहे.
advertisement
10/14
चिली (Chile) : लांब किनारपट्टी आणि अन्न उत्पादकतेमुळे युद्धाचा ताण सहन करण्यास सक्षम आहे.
advertisement
11/14
फिजी (Fiji) : ऑस्ट्रेलियापासून दूर, मोठे सैन्य नाही, घनदाट जंगल आणि नैसर्गिक संसाधनांमुळे सुरक्षित आहे.
advertisement
12/14
दक्षिण आफ्रिका (South Africa) : सुपीक जमीन आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे कठीण परिस्थितीतही अन्नसुरक्षा राखली जाऊ शकते.
advertisement
13/14
अंटार्क्टिका (Antarctica) : अति दक्षिणेला कोणतीही आक्रमक शक्ती नाही. विशाल भूभागात आश्रय असला तरी, अत्यंत थंड हवामानामुळे तिथे जगणे कठीण आहे.
advertisement
14/14
यावरून असं म्हणता येईल की, महायुद्धासारख्या गंभीर परिस्थितीत या देशांमध्ये आश्रय घेणे तुलनेने सुरक्षित ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/General Knowledge/
तिसरं महायुद्ध झालंच, तर जगातील कोणते देश राहण्यासाठी सुरक्षित आहेत? 90% लोकांना माहीत नाही याचं उत्तर