थंडीचा कडाका! ठाणे, कल्याण-डोंबिवलीत तापमान घसरले; आजचं हवामान कसं असेल?
Last Updated:
Thane Weather Update : ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली शहरात आज थंडीची तीव्रता वाढली आहे. तापमानात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांनी सकाळीच उबदार कपड्यांचा आधार घेतला असून थंडीचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे.
advertisement
1/5

थंडगार वारे वाहु लागल्याने राज्यात गारठा पसरला आहे. अनेक जिल्ह्यांत सकाळी उशिरापर्यंत धुके पहायला मिळतील. तर बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा खूपच खाली घसरताना दिसतो. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून थंडीची लाट सर्वत्र राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे . 23डिसेंबर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिह्यातील इतर शहरांचा आजचे हवामान अपडेट जाणून घेऊयात...
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात आज पारा घसरल्याने 22डिसेंबर पेक्षा जास्त थंडी जाणवत आहे.23डिसेंबर किमान तापमान 12 सेल्सिअस पर्यंत घट झाली असून कमाल तापमान 23ते 28अंश च्या दरम्यान राहू शकते, ज्यामुळे दिवसा ऊबदार आणि रात्री थंड हवामानाचा अनुभव येईल,यामुळे नागरिक आरोग्याची काळजी घ्यावी
advertisement
3/5
काही दिवसापासून असलेली थंडी डोंबिवली शहरामध्ये काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. 23डिसेंबर शहरातील हवामान स्वच्छ, थंड आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 30अंश सेल्सिअस असेल त्यामुळे सकाळी थंडी ,दिवसा उबदारपणा जाणवेल आणि रात्री गारठा वाढण्याची शक्यता आहे .
advertisement
4/5
बदलापूरमध्ये 23 डिसेंबर रोजी तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे, किमान तापमान सुमारे 14अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 30अंश सेल्सिअस तर बदलापूर प्रमाणेच आज मुरबाड-शहापूरमध्ये थंडीची चाहूल लागेल, हवामान कोरडे आणि प्रसन्न असल्याने किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आणि कमाल 37अंश सेल्सिअस असल्याने आज बाहेरच्या कामांसाठी किंवा फिरण्यासाठी उत्तम वातावरण आहे. .
advertisement
5/5
कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात सध्या कडाक्याची थंडीची लाट असून, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सोमवार प्रमाणे आज हवामानात थंडी जाणवेल,किमान तापमानस 12अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 28अंश सेल्सिअस असल्याने दिवसा उबदारपणा असण्याची शक्यता वर्तवली आहे.हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी थंडीपासून बचाव करावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
थंडीचा कडाका! ठाणे, कल्याण-डोंबिवलीत तापमान घसरले; आजचं हवामान कसं असेल?