TRENDING:

जगात भारी! 9 देशांची चव, एकाच पत्त्यावर; कल्याणमधील 'या' ठिकाणी मिळतात 480 पेक्षा जास्त फॉरन फुड

Last Updated:
Asian Food In Kalyan : काय मग तुम्हालाही काहीतरी हटके खायची इच्छा असेल, तर कल्याणमध्ये मिळणारा स्वादिष्ट आणि हेल्दी रामेन व्हेज नुडल्स बाउल एकदा नक्की ट्राय करा.
advertisement
1/7
कल्याणमधील 'या' ठिकाणी मिळतात 480 पेक्षा जास्त फॉरन फुड
1. सध्या तरुणांमध्ये भारतीय शिवाय अन्य देशातील खाद्य संस्कृतीबाबत विशेष खाद्य आवड निर्माण झालेली आहे. ज्यात रामेन व्हेज नुडल्स बाउल आवडीने खाल्ला जातो. जर तुम्हालाही हा पदार्थ खायच असेल तर कल्याणमध्ये नक्की याव लागतय.
advertisement
2/7
कल्याणमध्ये चव आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ अनुभवायचा असेल तर नमस्ते कल्याण बाय एशियन वोक अँड ग्रिल हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. येथे मिळणारा रामेन व्हेज नुडल्स बाउल पाहताच भूक लागेल असा आकर्षक दिसतो.
advertisement
3/7
मशरूम, गाजर, बेबीकॉर्न, पोकचॉय, कांद्याचीपात आणि हिरवे वाटाणे यांसारख्या ताज्या भाज्यांचा वापर करून हा बाउल तयार केला जातो. लसूण, आले आणि तिळाच्या तेलाचा हलका तडका दिल्याने त्याला खास एशियन चव मिळते.
advertisement
4/7
यामध्ये जपानी किमची नुडल्स, ताजे तीळ आणि ब्रोकली मिसळल्यावर संपूर्ण पदार्थाला स्वादिष्ट सुगंध येतो. शेवटी भाजीपाला सूपच्या हलक्या आणि रसाळ चवीमुळे हा नुडल्स बाउल अधिकच खास बनतो.
advertisement
5/7
याशिवाय येथे मिळणारा फ्रेश मोजीटो आवर्जून चाखावा असा आहे. सफरचंद आणि अननसाचा रस, किव्ही क्रश, तुळशीची पाने आणि सोडा यांच्या मिश्रणातून तयार होणारे हे पेय जेवणानंतर फ्रेश वाटायला मदत करते आणि ग्राहकांची विशेष पसंती मिळवते.
advertisement
6/7
या रेस्टॉरंटचा मेनू खूपच मोठा आणि विविधतेने भरलेला आहे. तब्बल नऊ देशांतील 480 पेक्षा जास्त पदार्थ येथे उपलब्ध आहेत. एशियन पदार्थांसोबतच नॉर्थ इंडियन, पंजाबी, खाऊसे, डिमसम, बाव यांसारखे अनेक पर्याय येथे मिळतात. त्यामुळे कल्याणसह आजूबाजूच्या परिसरातील फुडीज खास या ठिकाणी जेवणासाठी येतात.
advertisement
7/7
हे ठिकाण कल्याण स्टेशनपासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. जे नमस्ते कल्याण बाय एशियन वोक अँड ग्रिल, रॉक माउंट, खडकपाडा, कल्याण (पश्चिम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
जगात भारी! 9 देशांची चव, एकाच पत्त्यावर; कल्याणमधील 'या' ठिकाणी मिळतात 480 पेक्षा जास्त फॉरन फुड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल