TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, माथेरानपेक्षा बदलापूर थंड, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7
कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, माथेरानपेक्षा बदलापूर थंड, हवामान विभागाचा अलर्ट
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवाड्यात राज्यात पारा घसरला असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण झाली आहे. ठाणे-मुंबईसह कोकणात देखील तापमानात मोठी घट झालीये. ठाण्यातील तापमान 13 अंशांपर्यंत खाली आलं असून शहरासह ग्रामीण भागात चांगलाच गारठा जाणवत आहे. 11 डिसेंबर रोजी ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कल्याणमध्ये दिवसा स्वच्छ आणि कोरडे हवामान आहे. शहरातील दिवसाचे कमाल तापमान 33°C ते 35°C पर्यंत, तर किमान तापमान 20°C ते 23°C च्या दरम्यान राहू शकते. सकाळ आणि रात्री थोडी थंडी जाणवेल, तर दुपारनंतर हवामान उबदार राहील.
advertisement
3/7
आज डोंबिवली शहरातील हवामान साधारणपणे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी काही ठिकाणी धुके असू शकते. तर दिवसभर हवामान उबदार आणि रात्री थंड असेल. कमाल तापमान 32-33°C आणि रात्रीचे किमान तापमान 15-16°C च्या दरम्यान असेल, हवामान थंड असल्याने आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात तापमानात मोठी तफावत दिसत आहे. कमाल तापमान 36 ते 37 अंशांपर्यंत जात असून किमान तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. आज देखील हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी हाडं गोठवणारी थंडी तर दुपारी होरपळून काढणारं उन्ह अशी स्थिती राहील.
advertisement
5/7
बदलापूर शहरातील किमान तापमान साधारणपणे 12°C ते 15°C च्या दरम्यान आणि कमाल तापमान 25°C ते 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ, कोरडे आणि थंड असेल, ज्यामुळे दिवसा फिरण्यासाठी आणि बाहेरच्या कामांसाठी चांगला दिवस राहील.
advertisement
6/7
शहापूरमध्ये कमाल तापमान 31°C पर्यंत आणि किमान तापमान 16°C पर्यंत असू शकते. हवामान कोरडे व निरभ्र राहील. मुरबाडमधील हवामान साधारणपणे उबदार व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, ज्यात कमाल तापमान साधारणपणे 27°C ते 29°C च्या दरम्यान आणि किमान तापमान 16°C ते 18°C च्या दरम्यान असू शकते,ज्यामुळे दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामान असेल.आणि मुरबाडमधील हवामान पाहता साधारणपणे उबदार व अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, ज्यात कमाल तापमान साधारणपणे २७°C ते २९°C च्या दरम्यान आणि किमान तापमान १६°C ते १८°C च्या दरम्यान असू शकते,ज्यामुळे दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामान असेल.
advertisement
7/7
राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढला असून, काही जिल्ह्यांत ‘कोल्ड वेव्ह’ची स्थिती निर्माण झाली आहे. आज 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अळर्ट जारी केला आहे. ठाण्यातील कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरांत देखील गारठा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, माथेरानपेक्षा बदलापूर थंड, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल