TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हुडहुडी, पारा 12 अंशांच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. तापमानात मोठी घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे.
advertisement
1/5
कल्याण-डोंबिवलीत हुडहुडी, पारा 12 अंशांच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढला असून काही भागात थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आज पुन्हा ‘कोल्ड वेव्ह’चा अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे आणि कोकणात देखील हवामानात बदल दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीह ठाणे परिसरातील 21 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात शनिवारच्या तुलनेत आज गारठा काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात 1 अंशांची वाढ झाली असून पारा 21 अंश सेल्सिअसवर गेला आहे. आज दिवसभर थंडीची लाट जाणवू शकते. दिवसा तापमान सामान्य राहील आणि हवामान आल्हाददायक असेल. त्यामुळे बाहेर पडताना उबदार कपडे घालणे योग्य राहील.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील तापमान काल आणि आज स्थिर असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहू शकते. त्यामुळे किमान तापमान साधारणपणे 12 अंशांवर राहील. तर कमाल तापमानात वाढ होऊन ते 30 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी थोडे धुके आणि थंडी असेल आणि दिवसभर वातावरण दमट व कोरडे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात कालच्या तुलनेत पारा घसरल्याने आज थंडीचा कडाका जाणवेल. किमान तापमान 12 अंशांपर्यंत घसरले आहे. ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव शहरापेक्षा जास्त जाणवत आहे. सकाळी थंडीसह दाट धुके आणि दुपारी उष्णता असे चित्र आहे.
advertisement
5/5
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ठाणे आणि उपनगरांत थंडीचा कडाका कायम आहे. बदलापूरमध्ये किमान तापमान 12 अंश तर कमाल 23 अंश सेल्सिअस राहील. तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यांसाठी आज हवामान साधारणपणे स्वच्छ, थंड आणि कोरडे असेल. किमान तापमान 12 अंश तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हुडहुडी, पारा 12 अंशांच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल