TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता, कल्याण-डोंबिवलीत 2 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता, कल्याण-डोंबिवलीत 2 फेब्रुवारीला हवामान कसं?
महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने बदल दिसत आहेत. कधी थंडी, कधी उकाडा, तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक या अनिश्चित हवामानाच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. पुढील काही दिवस किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसल्याने थंडीचा जोर मर्यादित राहील. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सकाळी काही ठिकाणी हलके धुके व थंडी असून, दिवसा कडक ऊन राहील. कल्याण-डोंबिवली परिसरातील 2 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमानात घट झाली आहे. सोमवारी हवामान मुख्यतः स्वच्छ आणि उष्ण राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 36 अंश, तर किमान तापमानात घट होऊन 22 अंश सेल्सिअस राहील. सकाळी हवामानात हलका बदल जाणवून वातावरण कोरडे राहील.
advertisement
3/5
फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून डोंबिवली शहरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोमवारी वातावरण कोरडे, अंशतः ढगाळ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा उबदार तर रात्री सुखद थंडीचा अनुभव येईल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान सुखद आणि अंशतः ढगाळ राहील. पहाटे हलका गारवा आणि सकाळच्या वेळी उशिरापर्यंत धुके असेल. किमान तापमान 19-20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30-33 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा उष्ण आणि संध्याकाळी दमट हवामान अनुभवायला मिळेल.
advertisement
5/5
गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमधील हवामान स्थिर आहे. 2 फेब्रुवारीला सुद्धा वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होऊन 10 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दिवसा ऊबदार, तर रात्री थंडी जाणवू शकते. मुरबाड तालुक्यात हवामान प्रामुख्याने ढगाळ राहील. कमाल तापमान 32 अंश राहील. तर शहापूरमधील हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता, कल्याण-डोंबिवलीत 2 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल