TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, बुधवारी थंडी की पाऊस? पाहा आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. बुधवारी हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, बुधवारी थंडी की पाऊस? आजचं अपडेट
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवले. ऐन थंडीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा हवापालट झाली असून थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. तर धुरक्यांमुळे हवा खराब झाली असून काही ठिकाणी एक्यूआय 200 पार गेला आहे. 7 जानेवारीला ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान कसे असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान साधारणपणे सुखद आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे, मंगळवारच्या किमान आणि कमाल तापमानात 7 जानेवारी रोजी स्थिरता आहे. किमान तापमान 21अंश तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल. दिवसा हवामान उबदार आणि रात्री थंडी जाणवेल. हवेतील बदलांमुळे प्रदूषण वाढल्याने बाहेर पडताना नागरिकांनी मास्क लावणे गरजेचे आहे.
advertisement
3/5
डोंबिवलीमध्ये दोन दिवसांपासून थंडीची लाट संपून हवामान आल्हाददायक होत आहे. गारठा कायम असून किमान तापमान 19 अंश तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलक्या धुक्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग मंद असेल. वातावरण बदलामुळे नागरिकांना खोकला सर्दी सारखे आजार होण्याआधीच शक्यता आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 7 जानेवारी रोजी वातावरण अंशतः ढगाळ आणि काही ठिकाणी हलके धुके असू शकते. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास तर रात्री 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच धुके आणि वाढत्या प्रदूषणाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन 7 जानेवारी रोजी 8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. हवामान स्वच्छ आणि थंड असेल, तर शहापूर मुरबाड मध्ये पहाटे आणि रात्री गारवा राहील. दुपारी उबदारपणा असून किमान तापमान 22 अंश तर कमाल तापमान 32 अंश असेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवा बिघडली, बुधवारी थंडी की पाऊस? पाहा आजचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल