TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : राकेश-राखी खरंच एकमेकांच्या प्रेमात की फक्त ड्रामा? 'भाऊचा धक्का'वर अखेर सत्य समोर

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Raqesh Bapat :
advertisement
1/7
राकेश-राखी खरंच एकमेकांच्या प्रेमात की फक्त ड्रामा; 'भाऊचा धक्का'वर अखेर सत्य समोर
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सध्या लव्ह अँगल कोणात आहे तर तो राखी आणि राकेश यांच्यात. त्यांच्या प्रेमाची चर्चा घरातच नाही तर घराबाहेरही होते. राखी राकेशच्या मागे हात धुवून लागलेली असते, पण राकेश मात्र तिच्यापासून दूर पळताना दिसतो.
advertisement
2/7
राकेश भाव देत नसल्याने राखी सतत नाराज असते. हेच लक्षात घेऊन भाऊचा धक्कावर एकदा या दोघांचं लग्नही लावून देण्यात आलं. पण राकेश राखीला घरातील दुसऱ्या महिला सदस्यांसोबत काही ना काही करून तिला जळवण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
3/7
राकेश आणि राखी यांच्यातील हे लव्ह सीन म्हणजे काही वेळा फक्त मजा वाटते तर काही वेळा ते गंभीर वाटतं. मग राकेश आणि राखी यांच्यात नक्की काय आहे, हे खरंच प्रेम आहे की हा फक्त ड्रामा आहे? असा प्रश्न कित्येक प्रेक्षकांना पडला असेल.
advertisement
4/7
दरम्यान राखी आणि राकेश यांच्यातील प्रेमाचा खुलासा भाऊचा धक्कावर होणार आहे. त्यांच्यातील प्रेमाचं सत्य अखेर समोर येणार आहे. बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काचा नव्या एपिसोडमधून हे दिसून येत आहे.
advertisement
5/7
प्रोमोत तुम्ही पाहू शकता राखी एका खुर्चीवर बसली आहे. समोर घरातील सदस्य आहेत. रितेश विचारतो,  'राखी यांचं राकेशवरील प्रेम आहे आणि राहणार?' यावर घरातील सगळे सदस्य हो म्हणतात आणि राखीला झटका मिळतो.
advertisement
6/7
यावर राखी विचारते अरे तो हो म्हटला ना, यावर राकेश तिला सांगतो हो म्हटल्यावरच मिळणार शॉक. मग रितेश सांगतो, राखी नाही म्हटलं तर तुम्हाला जास्त शॉक बसेल.
advertisement
7/7
भाऊचा धक्कावर हा असा झटका सगळ्यांना मिळणार आहे. काय खरं, काय खोटं ते समोर येणार आहे. त्यामुळे हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : राकेश-राखी खरंच एकमेकांच्या प्रेमात की फक्त ड्रामा? 'भाऊचा धक्का'वर अखेर सत्य समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल