TRENDING:

18 वर्षांपूर्वी रिलीज झालेली फिल्म; अनिल कपूरला आजही मिळतात त्याचे पैसे, कमवतो लाखो रुपये

Last Updated:
Anil Kapoor Film : अभिनेता अनिल कपूर यांनी स्वत: आपल्या त्या 18 वर्षांपूर्वीच्या फिल्मबाबत सांगितलं आहे, ज्याचे पैसे आजही त्यांना मिळतात.
advertisement
1/7
18 वर्षांपूर्वी रिलीज झालेली फिल्म; अनिल कपूरला आजही मिळतात त्याचे पैसे, कमवतो लाखो रुपये
अनिल कपूर बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक. हा अभिनेता आजही इतका एनर्जिटिक आहे की तरुण अभिनेतेही त्याच्यासमोर फिके आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही अनिल कपूरने 18 वर्षांपूर्वी केलेली एक फिल्म ज्याचे पैसे आजही त्यांना मिळत आहेत. या पैशांतून ते लाखो रुपये कमवतात.
advertisement
2/7
अनिल कपूर यांची सुबेदार ही फिल्म ओटीटीवर रिलीज झाली आहे. यानंतर नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या जुन्या फिल्ममधून आजही त्यांची कमाई कशी होते ते सांगितलं आहे.
advertisement
3/7
अनिल कपूर म्हणाला, "मला हे तुमच्यासोबत शेअर करायलाच हवं. हा एक खूप भावनिक क्षण आहे. दीड दशकाहून अधिक काळ लोटला आहे आणि काल पुन्हा एकदा मला त्या फिल्मसाठी पैसे देण्याचा चेक मिळाला."
advertisement
4/7
टीम म्हणाली होती की, मी त्यांना परवडणार नाही. मी म्हणालो, मी पैसे मागितले का?' मी ते मोफत करेन. मी स्वतःला काहीतरी शिकवण्यासाठी तो चित्रपट केला. मला शिकायचं आहे. पण त्यांनी त्यांनी ते सर्व स्वतः केलं. मी मागितलं नाही. त्यांनी मला ते दिले.
advertisement
5/7
त्याला किती पैसे मिळाले असं विचारलं असता तो म्हणाला, "काल ते 3000 पाऊंड म्हणजे 3.5 लाख रुपये होते, ही रक्कम सुमारे अर्धा दशलक्ष पाऊंड म्हणजे सुमारे 6 कोटी होणार आहे. मी माझे सर्व टॅक्स भरतो म्हणून सांगू शकतो. मी करोडपती आहे"
advertisement
6/7
अनिल कपूर यांची ही फिल्म आहे स्लमडॉग मिलेनियर. अभिनय शिकण्यासाठी त्यांनी मोफत ऑफर केलेली ही फिल्म दीड दशकानंतरही त्यांच्या कमाईचा मार्ग आहे.
advertisement
7/7
डॅनी बॉयल दिग्दर्शित ही फिल्म विकास स्वरूप यांच्या 'क्यू अँड ए' या कादंबरीवर आधारित. फिल्ममध्ये अनिल कपूरने शो होस्ट प्रेम कुमारची भूमिका केली होती. 2009 मध्ये या फिल्मला 10 अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आणि आठ पुरस्कार जिंकले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
18 वर्षांपूर्वी रिलीज झालेली फिल्म; अनिल कपूरला आजही मिळतात त्याचे पैसे, कमवतो लाखो रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल