TRENDING:

Weather Alert: 11 ते 4 घरीच थांबा! दुहेरी संकटानं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चच्या मध्यावर दुहेरी संकट घोंघावत आहे. उष्णतेची लाट असतानाच काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: 11 ते 4 घरीच थांबा! दुहेरी संकटानं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात 72 तासांसाठी अलर्ट
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> मार्च महिन्याच्या मध्यावर महाराष्ट्रात हवामानाचं दुहेरी संकट जाणवत आहे. काही भागात उष्णतेची लाट असतानाच काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे. आज, 15 मार्च रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत ‘हिट वेव्ह’चा इशारा आहे. तर बहुतांश विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. मुंबईत कमाल तापमान 31 अंशांवर राहील. आद्रता जास्त राहील आणि हलकी धुंध दिसेल. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आज पावसाचा इशारा नाही. आकाश निरभ्र ते हलके ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत पारा चांगलाच चढला होता. आता मात्र अवकाली संकट घोंघावत आहे. आज सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. पुण्यात हलका पाऊस तर कोल्हापुरात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील 2-3 दिवस संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल.
advertisement
4/7
विदर्भात हवामानाची विचित्र स्थिती जाणवत आहे. अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम आहे. तर उर्वरित विदर्भात वेगवान वारे आणि विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. आज कमाल तापमान 37-41 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. 17-20 मार्चनंतर काही भागांत अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात देखील वारं फिरलं आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली असून पावसाला पोषक हवामान आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कमाल तापमान 37-40 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
मराठवाड्याचा पारा चांगलाच चढला आहे. अशातच आता अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. 14 ते 19 मार्चदरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. आज बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 15 मार्चला मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहील. तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू घट होईल, आणि 17-20 मार्चदरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढेल. आज उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: 11 ते 4 घरीच थांबा! दुहेरी संकटानं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात 72 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल