Weather Alert: कल्याण-डोंबिवली हवामानात मोठे बदल, पुन्हा थंडीची लाट येणार? IMD कडून अलर्ट
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हवामान स्थिर होत असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात थंडी कमी झाली तरी गारठा कायम राहणार असल्याचे कळते. बघुयात कल्याण-डोंबिवली शहरातील आजचे हवामान अपडेट
advertisement
1/5

राज्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीची लाट काही दिवस आणखी पहायला मिळेल. मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा समांतर असून, थंडगार वारे वाहु लागल्याने गारठा पसरला आहे. हवामान स्थिर होत असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात थंडी कमी झाली तरी गारठा कायम राहणार असल्याचे कळते. बघुयात कल्याण-डोंबिवली शहरातील आजचे हवामान अपडेट
advertisement
2/5
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवामान आल्हाददायक राहील. कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत आणि रात्री गारठा जाणवून किमान तापमान 20 ते 22 अंशच्या दरम्यान राहू शकते, ज्यामुळे दिवसा ऊबदार आणि सकाळ-रात्री थंड हवामानाचा अनुभव येईल.
advertisement
3/5
कल्याण -डोंबिवली शहरातील तापमान घसरलेले दिसेल. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहू शकते. त्यामुळे किमान तापमान 18.3 अंश ते कमाल तापमानात वाढ होऊन 32 अंश सेल्सिअस झाले आहे. सकाळच्या वेळी थोडे धुके आणि थंडी असेल आणि दिवसभर वातावरण दमट व कोरडे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
ग्रामीण भागात कालच्या तुलनेत शहरापेक्षा आज स्थिरता जाणवेल, सकाळी आणि रात्री कडाक्याची थंडी तर दुपारी उबदार हवामान असेल.तापमान घसरून किमान तापमान 12अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस जाऊ शकते.ईशान्येकडून थंड वारे वाहत असल्याने ,सकाळी धुक्याची शक्यता आहे आणि दिवसा ऊन असेल.
advertisement
5/5
बदलापूर शहरातील थंडीचा कडाका अजून काही दिवस असल्याने रविवारीच्या हवामानात आज काहीच बदल होणार नसून किमान तापमान 12 अंश तर कमाल तापमान 15 अंश सेल्सिअस असेल. तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यांसाठी आज हवामान साधारणपणे स्वच्छ, थंड आणि कोरडे असेल. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे दिवसा तापमान मध्यम असून सकाळ संध्याकाळ गारवा जाणवेल सौम्य वारे आणि हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांची शक्यता असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवली हवामानात मोठे बदल, पुन्हा थंडीची लाट येणार? IMD कडून अलर्ट