धुक्यात दडून बसलेला काळ, पण दैव बलवत्तर; संरक्षक कठड्यानं वाचवलं, दरीत लटकली अर्धी कार
- Published by:Priya Lad
Last Updated:
देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना, याचाच प्रत्यय आला तो सिंधुदुर्गच्या तिलारी घाटात. जिथं एक कार दरीत कोसळता कोसळता वाचली आहे. (विशाल रेवडेकर/प्रतिनिधी, सिंधुदुर्ग)
advertisement
1/5

मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल काही सांगू शकत नाही. पण काही लोक इतके नशीबवान असतात की मृत्यूच्या दारातून परत येतात. अशीच घटना घडली ती सिंंधुदुर्गमध्ये.
advertisement
2/5
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाटात एक कार धुक्यात भरकटली. ही कार जवळपास मृत्यूच्या दारातच पोहोचणार होती. पण सुदैवाने ती दरीत कोसळली नाही.
advertisement
3/5
ही कार गोव्यातील असून ती तिलारी घाटातून जात होती, त्यावेळी वळणावर दाट धुक्यांचा अंदाज न आल्याने कारचा अपघात झाला. कार संरक्षक कठड्यावर चढली.
advertisement
4/5
हा संरक्षक कठडा म्हणजे या कारसाठी देवदूतच ठरला. त्याने या कारला वाचवलं. कार बरोबर संरक्षक कठड्याच्या मध्येच अडकली. त्यामुळे ती दरीत कोसळली नाही.
advertisement
5/5
जर का संरक्षक कठडा नसता तर कार थेट दरीत कोसळली असती आणि कारमधील सर्वांनी आपला जीव गमावला असता. सुदैवाने हा घटनेत कुणीही जखमी झालं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
धुक्यात दडून बसलेला काळ, पण दैव बलवत्तर; संरक्षक कठड्यानं वाचवलं, दरीत लटकली अर्धी कार