Skin Care Routine : आठवड्यातून फक्त 2 वेळा फेसवॉश करते अभिनेत्री शमिता शेट्टी! स्वतः सांगितले याचे फायदे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Actress Shamita shetty tell her skin care routine : सुंदर दिसण्यासाठी किंवा आपली त्वचा कायम निरोगी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी मुली खूप प्रयत्न करत असतात. बऱ्याच अभिनेत्रींनाही त्या फॉलो करतात. त्यांचे स्किन केअर रुटीन फॉलो करतात. अभिनेत्रीही बऱ्याच उपयोगी टिप्स शेअर करत असतात. असेच अभिनेत्री शमिता शेट्टी हिने तिचे स्किन केअर रुटीन एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
advertisement
1/5

अभिनेत्री शमिता शेट्टीने सांगितले की, ती आठवड्यातून केवळ 1 ते 2 वेळच फेस वॉश करते. तिने आणखीही काही स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत. ज्या फॉलो केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोइंग आणि निरोगी राहते. चला पाहूया तिने सांगितल्या टिप्स.
advertisement
2/5
पुरेसे पाणी पिणे : शमिताने सांगितले की, ती पुरेशा प्रमाणात पाणी पिते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. म्हणून रोज किमान 8-10 ग्लास पाणी पिण्याचा तिने सल्ला दिला.
advertisement
3/5
साबणाचा वापर कमी : शमिताने पुढे सांगितले की, ती तिच्या चेहऱ्यावर साबण अजिबात वापरत नाही. कारण साबणात अनेक हानिकारक रसायने असतात, जी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि कोरडी होते. शमिताने सांगितले की ती आठवड्यातून एक किंवा दोनदाच फेसवॉश वापरते. निरोगी त्वचेसाठी केवळ पाण्याने चेहरा धुण्याचा तिने सल्ला दिला.
advertisement
4/5
मॉइश्चरायझरचा वापर : शमिता म्हणाली, ती चेहऱ्यावर भरपूर मॉइश्चरायझर लावते. त्वचा उत्तम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे आणि ती हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा तरुण आणि ताजी राहते. अशा प्रकारे तुम्ही वृद्धत्वाच्या लक्षणांपासून स्वतःचे संरक्षण देखील करू शकता.
advertisement
5/5
शमिता शेट्टीने सांगितले, ती नाईट आणि डे क्रीम्स वापरते. हे दोन्ही क्रीम्स त्वचेचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यासाठी खूप चांगले काम करतात. म्हणूनच ज्याने त्याने त्याच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्रीम्स निवडल्या पाहिजेत. याने त्वचेला खूप फायदा होतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Routine : आठवड्यातून फक्त 2 वेळा फेसवॉश करते अभिनेत्री शमिता शेट्टी! स्वतः सांगितले याचे फायदे