TRENDING:

Tea Secret : प्रसिद्ध 'अमृततुल्य' चहाचा मसाला घरी कसा बनवायचा? 'या' स्टेप्स फॉलो करा, मग मनासारखा होईल चहा

Last Updated:
खरे तर, अमृततुल्य चहाची खरी जादू त्याच्या मसाल्याच्या प्रमाणात आणि चहा बनवण्याच्या खास पद्धतीत दडलेली असते. आज आम्ही तुम्हाला तोच 'सीक्रेट' अमृततुल्य चहा मसाला घरी कसा बनवायचा, याची सविस्तर रेसिपी सांगणार आहोत.
advertisement
1/8
अमृततुल्य चहाचा मसाला घरी कसा बनवायचा? 'या' स्टेप्स फॉलो करा, मनासारखा होईल चहा
'अमृततुल्य' चहाची चव ही केवळ पुण्यातच नाही, तर आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. मुंबईत देखील या चहाला खूप मोठी मागणी आहे आणि मुंबईकर याचे फॅन्स आहेत. पितळी हंड्यात उकळणारा तो चहा आणि त्याचा दरवळणारा सुवास कोणालाही थांबायला भाग पाडतो. अनेकदा आपण विचार करतो की, या चहामध्ये असा कोणता 'सीक्रेट मसाला' असेल ज्यामुळे ही चव घरी येत नाही?
advertisement
2/8
खरे तर, अमृततुल्य चहाची खरी जादू त्याच्या मसाल्याच्या प्रमाणात आणि चहा बनवण्याच्या खास पद्धतीत दडलेली असते. आज आम्ही तुम्हाला तोच 'सीक्रेट' अमृततुल्य चहा मसाला घरी कसा बनवायचा, याची सविस्तर रेसिपी सांगणार आहोत.
advertisement
3/8
पुणे आणि अमृततुल्य चहा यांचं एक अतुट नातं आहे. पहाटेची वेळ असो किंवा कामाचा ताण, एक कप अमृततुल्य चहा पिला की थकवा क्षणात गायब होतो. हा चहा इतर चहापेक्षा वेगळा असतो कारण त्यात वापरले जाणारे वेलची, दालचिनी आणि सुंठीचे प्रमाण अतिशय संतुलित असते.
advertisement
4/8
अमृततुल्य चहा मसाल्यासाठी लागणारे साहित्य:अमृततुल्य मसाल्यात मसाल्यांचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते. साधारणपणे खालील प्रमाणात साहित्य घ्याहिरवी वेलची: 50 ग्रॅमसुंठ (वाळलेले आले): 30 ग्रॅमदालचिनी: 10 ग्रॅमलवंग: 5 ग्रॅमकाळी मिरी: 5 ग्रॅमजायफळ: 1 लहान तुकडा (किसून)
advertisement
5/8
मसाला बनवण्याची कृती:1. साहित्य स्वच्छ करा: सर्वात आधी सर्व मसाले निवडून स्वच्छ करून घ्या. त्यातील कचरा किंवा काड्या काढून टाका.2. मसाले भाजणे: गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा. त्यात वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी मंद आचेवर केवळ 1-2 मिनिटे गरम करा. मसाले खूप भाजायचे नाहीत, फक्त त्यातील ओलावा (Moisture) निघून जावा इतपतच गरम करायचे आहेत.3. सुंठ आणि जायफळ: सुंठीचे छोटे तुकडे करून घ्या किंवा ती खलबत्त्यात कुटून घ्या. जायफळ किसून घ्या.4. वाटणे: सर्व मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र करा. मिक्सर चालू-बंद करत (Pulse mode) याची बारीक पावडर तयार करा. 5. साठवणूक: हा तयार झालेला मसाला एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. हा मसाला 2 ते 3 महिने आरामात टिकतो.
advertisement
6/8
'अमृततुल्य' चहा बनवण्याची खास पद्धत:केवळ मसाला असून चालत नाही, तर तो चहा बनवण्याची पद्धतही 'पुणेरी' हवी.पाणी आणि साखर: एका पातेल्यात पाणी, साखर आणि चहा पावडर एकत्र टाकून ते चांगले उकळू द्या.
advertisement
7/8
मसाला कधी टाकावा?चहा चांगला उकळला की त्यात अर्धा चमचा अमृततुल्य मसाला टाका. मसाल्याचा सुवास चहात उतरू द्या.दूध: अमृततुल्य चहामध्ये दूध नेहमी जास्त असते. पाणी आणि दूध यांचे प्रमाण साधारण 1:2 असे ठेवा. दूध टाकल्यानंतर चहा किमान 5-7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.चहा तयार झाल्यावर तो कपमध्ये गाळून घ्या. तयार आहे तुमचा गरमागरम पुणेरी अमृततुल्य चहा.
advertisement
8/8
पितळी भांडे: जर शक्य असेल तर चहा पितळी भांड्यात बनवा, त्यामुळे चवीत अधिक भर पडते.ताजेपणा: मसाला खूप जास्त प्रमाणात बनवून ठेवण्यापेक्षा थोड्या प्रमाणात बनवावा, जेणेकरून मसाल्याचा सुगंध टिकून राहील.अमृततुल्य चहा हा थोडा जास्त गोड असतो, त्यामुळे साखरेचे प्रमाण आवडीनुसार पण थोडे जास्त ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Tea Secret : प्रसिद्ध 'अमृततुल्य' चहाचा मसाला घरी कसा बनवायचा? 'या' स्टेप्स फॉलो करा, मग मनासारखा होईल चहा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल