Air Fryer vs. Deep Fryer : एअर फ्रायर की डीप फ्रायर, आरोग्यासाठी योग्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Fryer vs. Deep Fryer : बड्या बड्या हॉटेलमध्ये डीप फ्रायर वापरले जातात आणि एअर फ्रायर्स आजकाल खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येकजण त्याकडे एक आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहत आहे. पण या दोघांपैकी काय चांगलं?
advertisement
1/5

सामान्यपणे कोणतेही पदार्थ तळायचे असतील तर कढईत तेल टाकून आपण त्यात तळतो. पण आता पदार्थ तळण्यासाठी काही उपकरणं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डीप फ्रायर आणि दुसरं म्हणजे एअर फ्रायर. आता या दोघांपैकी काय चांगलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
2/5
जास्त तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच. पण तरी तळलेले पदार्थ खायचे म्हटले तर डीप फ्राय आणि एअर फ्राय कोणते पदार्थ चांगले आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
3/5
जर तुम्ही डीप फ्रायरमध्ये तेल वापरलं तर ते शरीरात कॅलरीज वाढवू शकतं आणि तुम्हाला कोलेस्टेरॉलसह उच्च रक्तदाबाची समस्या येऊ शकते. या सर्व गोष्टी हृदयरोगांकडे निर्देश करतात. दुसरीकडे एअर फ्रायर हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. यामध्ये आहारात असलेले पाणी गरम करून तळलं जातं. त्यात अन्न सहज शिजतं. यासोबतच, त्यात कमी कॅलरीज आढळतात.
advertisement
4/5
एअर फ्रायरमध्ये अन्न डीप फ्रायरपेक्षा अधिक सहजपणं शिजतं. पण एअर फ्रायरमध्ये शिजवलेलं अन्न डीप फ्रायरमध्ये बनवलेल्या अन्नासारखे कुरकुरीत होत नाही.
advertisement
5/5
तज्ञांच्या मते डीप फ्रायिंगपेक्षा एअर फ्रायर आरोग्यदायी ठरू शकतं. पण या दोन्ही गोष्टी स्वयंपाकासाठी वापरू नयेत. कारण दोन्हीचे स्वतःचे तोटे आहेत. शिवाय यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Air Fryer vs. Deep Fryer : एअर फ्रायर की डीप फ्रायर, आरोग्यासाठी योग्य काय?