TRENDING:

Benefits Of Almonds In Winter: हिवाळ्यात बदाम खाण्याचे आहेत चमत्कारीक फायदे, पाहा आणखी आश्चर्यकारक फायदे

Last Updated:
हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम.
advertisement
1/6
हिवाळ्यात बदाम खाण्याचे आहेत चमत्कारीक फायदे, पाहा आणखी आश्चर्यकारक फायदे
हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम.
advertisement
2/6
बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे. हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये बदामाचा समावेश करावा. कारण की बदामामुळे शरीरामध्ये एनर्जी निर्माण होते.
advertisement
3/6
हिवाळा म्हटले की आपल्याला एनर्जीची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने बदाम खाणे गरजेचे आहे. किमान दिवसातून चार ते पाच बदाम प्रत्येकाने खायला हवे. हे बदाम तुम्ही भिजवून किंवा न भिजवता देखील खाऊ शकता.
advertisement
4/6
बदामामध्ये भरपूर असे फॅट्स असतात. त्याचबरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम हे देखील घटक यामध्ये आहेत आणि हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर ज्यांना हृदय विकार आहे अशाने देखील बदाम आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावे. यामधून देखील भरपूर एनर्जी मिळते आणि हे हृदयासाठी चांगले असतात.
advertisement
5/6
तसेच बदाम तुम्ही हे विविध माध्यमातून घेऊ शकता. हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू किंवा त्याचबरोबर ड्रायफ्रूटचे लाडू बनवताना त्यामध्ये भरपूर असा बदामाचा वापर करावा. ज्या लहान मुलांना म्हशीचे किंवा गाईचं दूध सहन होत नाही. अशा मुलांना तुम्ही बदामाचे दूध देऊ शकता.
advertisement
6/6
बदामाचे दूध हे लहान मुलांना दिल्यानंतर त्यामधून भरपूर असं कॅल्शियम मिळतं आणि मुलांच्या वाढीसाठी चांगला असतं. त्याचबरोबर हाड देखील मजबुत होतात. बदमामधून भरपूर फायदे आपल्याला होत असतात. तर प्रत्येकानेच हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये बदामाचा समावेश करून घ्यावा, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits Of Almonds In Winter: हिवाळ्यात बदाम खाण्याचे आहेत चमत्कारीक फायदे, पाहा आणखी आश्चर्यकारक फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल