Makar Sankranti Couple Photo : लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या फोटोसाठी हटके कपल पोझ, आताच पाहून ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Makar Sankranti Couple Photoshoot Pose : लग्नानंतरची पहिली संक्रांत कपल्ससाठी खास असते. कपल काळे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करतात. त्यामुळे यानिमित्ताने फोटोशूट आलंच. तुमचीही लग्नानंतरची पहिली संक्रात असेल आणि फोटो पोझ हव्यात तर आताच पाहून घ्या.
advertisement
1/5

लग्नानंतर कपलची पहिली मकरसंक्रांत ही महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी खूप महत्त्वाची, भावनिक आणि सांस्कृतिक मानली जाते. ही सणाची केवळ सुरुवात नसून, नव्या नात्याची समाजात ओळख करून देणारा उत्सव असतो. या दिवशी सासर-माहेरकडून नव्या सून-जावयाला खास मान दिला जातो.
advertisement
2/5
नववधूला हळद-कुंकू, नवे कपडे, दागिने किंवा साडी दिली जाते. तिळगूळ, वाण, फराळ दिला जातो. सून प्रथमच सासरच्या महिलांना हळदी-कुंकवाला बोलावते.
advertisement
3/5
नववधूच्या माहेरकडून जावयाला उपरणे किंवा कपडे दिले जातात. नवदाम्पत्याला तिळगूळ, मिठाई, फराळ, काही ठिकाणी भेटवस्तूही देतात. याला जावयाचा मान असंही म्हणतात.
advertisement
4/5
नवरा-बायको दोघंही एकत्र तिळगूळ वाटतात. मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. काही कुटुंबांत पहिली संक्रांत एकत्र साजरी केली जाते. पतंग उडवणे, गाणी, खेळ रंगतात.
advertisement
5/5
मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा उत्तरायण प्रवास. उत्तरायण म्हणजे शुभ काळाची सुरुवात नव्या संसारासाठी समृद्धी, आरोग्य, गोडवा याची प्रार्थना यादिवशी केली जाते. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Makar Sankranti Couple Photo : लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या फोटोसाठी हटके कपल पोझ, आताच पाहून ठेवा