Almond benefits : बदाम खाल्ल्याने खरंच आपण हुशार होतो? सगळं काही लक्षात राहतं? संशोधनात समोर आलं सत्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Almond for brain : बदाम हे मेंदूसाठी फार पूर्वीपासून फायदेशीर मानले जात आहे, पण त्यामागे काही वैज्ञानिक आधार आहे का? यावर बरंच संशोधन झालं आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
advertisement
1/7

बदाम हे एक सुपरफूड मानलं जातं. बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लग होतो असं म्हणतात. म्हणून बहुतेक लोक बदाम मोठ्या प्रमाणात खातात. बहुतेक पालक त्यांच्या मुलांना भिजवलेले बदाम खायला घालतात. बदाम हे मेंदूसाठी फार पूर्वीपासून फायदेशीर मानलं जात आहे, पण त्यामागे काही वैज्ञानिक आधार आहे का? यावर बरंच संशोधन झालं आहे.
advertisement
2/7
हेल्थलाइनच्या अहवालानुसार बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे सर्व घटक मेंदूसाठी फायदेशीर मानले जातात. हे पोषक तत्व मेंदूच्या पेशींना पोषण देण्यास मदत करतात आणि न्यूरो-डीजनरेटिव्ह रोगांचा धोका कमी करू शकतात.
advertisement
3/7
बदाम खाल्ल्याने अल्झायमर आणि डिमेंशियाचा धोका कमी होऊ शकतो. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की दररोज बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते.
advertisement
4/7
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (UCLA) एका संशोधनातून असं दिसून आलं आहे की 6 महिने दररोज 5-6 बदाम खाल्ल्याने शालेय मुलांची एकाग्रता सुधारली. बदाम खाल्ल्याने मुलांची शैक्षणिक कामगिरी सुधारली.
advertisement
5/7
संशोधकांचा असा विश्वास आहे की बदामामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतात, ज्यामुळे मेंदू दीर्घकाळ निरोगी राहतो. याशिवाय, बदामामध्ये आढळणारे निरोगी चरबी न्यूरोट्रांसमीटर स्थिर ठेवतात, ज्यामुळे मूड सुधारू शकतो.
advertisement
6/7
काही संशोधनातून असंही दिसून आलं आहे की बदामामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांचा परिणाम वयानुसार बदलतो. बदाम खाल्ल्याने मुले आणि तरुणांमध्ये स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. वृद्धांमध्ये ते डिमेंशियाची लक्षणं कमी करण्यास आणि मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकते.
advertisement
7/7
तरी यासंदर्भात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदाम मेंदूसाठी फायदेशीर असतात, परंतु बदामाला मॅजिकल फूड मानलं जाऊ शकत नाही. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली, खाण्याच्या चांगल्या सवयी, नियमित शारीरिक हालचाल आणि चांगली झोप आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Almond benefits : बदाम खाल्ल्याने खरंच आपण हुशार होतो? सगळं काही लक्षात राहतं? संशोधनात समोर आलं सत्य