Jackfruit : फणस खायला आवडतो? पण त्यानंतर चुकूनही खाऊ नका या गोष्टी, अन्यथा होतील गंभीर परिणाम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
उन्हाळा सुरु झाल्याने बाजारात आंबे आणि फणसाची आवक सुरु झालेली आहे. अनेकांना फणस खायला भरपूर आवडतं. फणस चवीला गोड असला तरी त्याचे सेवन केल्यावर काही पदार्थ खाण टाळायला हवं अन्यथा आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
advertisement
1/5

फणस खाल्ल्यावर कधीही दूध पियू नये. तसेच दूध प्यायल्यानंतर देखील फणस खाण धोकादायक ठरू शकत. फणस आणि दूध हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचेसंबंधित आणि पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. उदाहरण, डाग, खरुज, खाज सुटणे, एक्जिमा आणि सोरायसिस
advertisement
2/5
मध आणि फणस एकत्र खाण देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. विशेषतः पिकलेला फणस खाल्ल्यानंतर मध खाऊ नये.
advertisement
3/5
पपई सोबत शिजवलेला फणस किंवा त्याची भाजी कधीही खाऊ नका. कारण यामुळे पोटात जळजळ होऊ शकते आणि पोट दुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
advertisement
4/5
अनेकजणांना पान आणि सुपारी खायची सवय असते. पण पिकलेला फ़णस खाल्ल्यावर पान सुपारीचे सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
5/5
फणस आणि भेंडीची भाजी या गोष्टी कधीही एकत्र खाऊ नका. भेंडी आणि फणस एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडणे सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jackfruit : फणस खायला आवडतो? पण त्यानंतर चुकूनही खाऊ नका या गोष्टी, अन्यथा होतील गंभीर परिणाम