Tea In Winter : हिवाळ्यात किती चहा पिणं शरीरासाठी Safe? काय सांगतात तज्ज्ञ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की थंडीच्या दिवसात चहा पिण्याचे फायदे काय आहेत आणि त्याची मर्यादा किती असावी.
advertisement
1/10

भारतातील अनेक घरातील सकाळची सुरुवात गरम गरम चहानेच होते. त्यात बाहेर थंडीचा कडाका वाढला की, गरम चहा प्यावा अशी सगळ्यांनच इच्छा होते. यामुळे अंगात तरतरी येते असं अनेकांना बोलताना देखील तुम्ही ऐकलं असाल. खिडकीबाहेर पडणारे धुके आणि हातात आल्याच्या चहाचा कप... हे समीकरण म्हणजे सुखच. हिवाळ्याच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि आळस झटकण्यासाठी चहा हा सर्वात जवळचा मित्र वाटतो. पण, तुम्हाला माहित आहे का? जो चहा तुम्हाला ताजेतवाने करतो, तोच अतिप्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
advertisement
2/10
त्यामुळेच तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की थंडीच्या दिवसात चहा पिण्याचे फायदे काय आहेत आणि त्याची मर्यादा किती असावी.
advertisement
3/10
हिवाळ्यात चहा पिण्याचे फायदेहिवाळ्यात चहा फक्त पेय नसून ते एक औषधासारखे काम करते, विशेषतः जर तो योग्य पद्धतीने बनवला असेल तर
advertisement
4/10
1. इम्युनिटी बूस्टर: चहामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.2. सर्दी-खोकल्यापासून आराम: चहामध्ये आलं, गवती चहा किंवा वेलची घातल्यास घशातील खवखव आणि सर्दी-खोकल्यात त्वरित आराम मिळतो.
advertisement
5/10
3. तणावमुक्ती: दिवसातून 2-3 कप चहा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि दिवसभराचा थकवा दूर होऊन मन प्रसन्न राहते.4. शरीरातील ऊब: कडाक्याच्या थंडीत गरम चहा प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
advertisement
6/10
नेमका किती चहा पिणे सुरक्षित आहे?आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीने दिवसातून 3 ते 4 कप (साधारण 200-250 मिलीचा एक कप) चहा पिणे सुरक्षित आहे. एका दिवसात आपल्या शरीराला 400 मिलीग्रॅमपर्यंत कॅफिन पचवण्याची क्षमता असते, जी साधारण 4 कप चहातून मिळते.अनेकजण थंडीमुळे दिवसातून 5-6 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त चहा पितात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. लहान मुले, गरोदर महिला किंवा विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी चहाचे प्रमाण मर्यादित ठेवणेच फायद्याचे ठरते.
advertisement
7/10
अति चहा पिण्याचे तोटे (Side Effects of Excessive Tea)चहाचे अतिसेवन केल्यास खालील समस्या उद्भवू शकतात:1. अ‍ॅनिमियाचा धोका: चहामधील 'टॅनिन' (Tannin) हे घटक अन्नातील लोह (Iron) शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते.2. झोपेच्या समस्या: जास्त कॅफिनमुळे निद्रानाश, अस्वस्थता आणि सतत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
advertisement
8/10
3. पोटाचे विकार: रिकाम्या पोटी किंवा जास्त चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.4. डिहायड्रेशन: चहा हे लघवीचे प्रमाण वाढवणारे पेय आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त चहा प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा कोरडी पडू शकते.
advertisement
9/10
आरोग्यदायी चहासाठी 'या' खास टिप्सजर तुम्हाला चहाचा आनंदही घ्यायचा असेल आणि निरोगीही राहायचे असेल, तर या गोष्टी नक्की पाळा:जेवणानंतर लगेच चहा टाळा: जेवण झाल्याबरोबर चहा पिऊ नका, किमान 1 तासाचे अंतर ठेवा.शक्य असल्यास कमी साखरेचा किंवा बिनसाखरेचा चहा पिण्याची सवय लावा. यामुळे वजन वाढणार नाही.
advertisement
10/10
हर्बल चहाचा पर्याय: दूध-साखरेच्या चहाऐवजी तुळस, आलं किंवा लेमन टी असे पर्याय निवडा.सवय बदला: जर तुम्हाला खूप जास्त चहा पिण्याची सवय असेल, तर ती हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.हिवाळ्यात चहा नक्की प्या, पण तो 'अमृत' ठरेल इतक्याच प्रमाणात! अतिरेक टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea In Winter : हिवाळ्यात किती चहा पिणं शरीरासाठी Safe? काय सांगतात तज्ज्ञ