Chicken Vs Mutton : चिकन की मटण आरोग्यासाठी काय जास्त चांगलं? कोणत्या भागात असतं सगळ्यात जास्त प्रोटीन?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चिकन आणि मटण हे दोन्हीही चवीला छान आणि पौष्टिक असतात. पण त्याचा कोणता भाग चवीला जास्त चांगला असतो? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.
advertisement
1/8

जे लोक फिट राहण्याचा किंवा बॉडी बिल्डिंगचा प्रयत्न करत असतात, त्यांच्यासाठी प्रोटीन हा आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण प्रोटीन शरीरातील स्नायू मजबूत ठेवतं, तुटलेले पेशी दुरुस्त करतं आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतं. म्हणूनच प्रोटीनचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं असतं आणि प्रोटीनचा चांगला सोर्स आहे नॉनवेज. ज्यामध्ये लोक चिकन, मटण आणि अंडी खातात.
advertisement
2/8
पण अनेकांचा या पदार्थांमध्ये गोंधळ उडतो की चिकन की मटण शरीरासाठी काय चांगलं असतं? चिकन आणि मटण हे दोन्हीही चवीला छान आणि पौष्टिक असतात. पण त्याचा कोणता भाग चवीला जास्त चांगला असतो? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.
advertisement
3/8
चिकनमधील प्रोटीनचिकनला नेहमीच हेल्दी नॉन-व्हेज फूड मानलं जातं, विशेषतः जिम करणाऱ्या आणि बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांसाठी.चिकन ब्रेस्ट (छातीचा भाग): हा भाग सगळ्यात कमी फॅट आणि जास्त प्रोटीन असतो. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 30-32 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 3-4 ग्रॅम फॅट असतं.
advertisement
4/8
चिकन थाई (जांघेचा भाग): या भागात चव जास्त आणि फॅट थोडं जास्त असतं. 100 ग्रॅम थाईमध्ये 24-26 ग्रॅम प्रोटीन आणि 8-10 ग्रॅम फॅट असतं.चिकन विंग्स आणि लेग पीस: हे भाग खूप चविष्ट असतात, पण त्यात फॅट जास्त असल्यामुळे जिम करणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच खावं.
advertisement
5/8
मटणमधील प्रोटीनमटण म्हणजे बकरीचं मांस हेही प्रोटीन आणि मिनरल्सचं चांगलं स्त्रोत आहे. चिकनच्या तुलनेत यात फॅट थोडं जास्त असतं, पण त्यातील पोषणमूल्य जबरदस्त असतात.लॉइन (पाठीचा भाग): या भागात 100 ग्रॅममध्ये 25-27 ग्रॅम प्रोटीन आणि 12-14 ग्रॅम फॅट असतं.
advertisement
6/8
लेग पीस (पायाचा भाग): या भागात सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन आणि 10 ग्रॅम फॅट असतं.शोल्डर (खांद्याचा भाग): या भागात फॅट जास्त असतं, पण ग्रेवी डिशेसमध्ये हा भाग सगळ्यात जास्त स्वादिष्ट लागतो.मटणमध्ये असलेले आयर्न, जिंक आणि व्हिटॅमिन B12 हे घटक मसल्स मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी उपयोगी ठरतात.
advertisement
7/8
शेवटी कोण चांगलं - चिकन की मटण?जर तुम्ही फॅट कमी करण्यावर आणि लीन मसल्स वाढवण्यावर लक्ष देत असाल, तर चिकन ब्रेस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे.पण जर तुम्ही मसल गेन किंवा स्ट्रेंथ बिल्डिंग करत असाल, तर मटण तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं, कारण त्यात चांगल्या प्रकारचे फॅट्स, आयर्न आणि जिंक असतात.
advertisement
8/8
दोन्हीही पदार्थ हेल्दी आहेत, फक्त त्यांना कमी तेलात, ग्रिल, रोस्ट किंवा स्टीम करून खाणं अधिक आरोग्यदायी ठरतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chicken Vs Mutton : चिकन की मटण आरोग्यासाठी काय जास्त चांगलं? कोणत्या भागात असतं सगळ्यात जास्त प्रोटीन?