TRENDING:

Contraceptive Implant Stick : प्रेग्नन्सी रोखणारी छोटी स्टिक कुठे मिळेल, नवीन गर्भनिरोधक कुठे उपलब्ध आहे?

Last Updated:
Contraceptive Implant Stick : गेल्या काही दिवसांत तुम्ही कॉन्टासेप्टिव्ह इम्प्लांट स्टिक या नव्या गर्भनिरोधकाबाबत ऐकलं आणि वाचलं असेल. पण हे गर्भनिरोधक नेमकं कुठे मिळेल, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.
advertisement
1/5
प्रेग्नन्सी रोखणारी छोटी स्टिक कुठे मिळेल, नवीन गर्भनिरोधक कुठे उपलब्ध आहे?
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी प्र सामान्यपणे कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. इंजेक्शन आणि कॉपर टी यासारखेही पर्याय उपलब्ध आहेत. पण अनेकदा गोळ्या घेणं विसरणं किंवा कॉपर टी मुळे त्रास अशा अनेक समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. कंडोमनेही पूर्णपणे गर्भनिरोधनाची शक्यता नसते. पण आता बाजारात नवीन गर्भनिरोधक आला आहे, ज्याचा त्रासही नाही आणि एकदा लावलं की 3 वर्षे प्रेग्नन्सीचं टेन्शनच नाही.
advertisement
2/5
तुम्हाला आश्चर्य वाटेल हे गर्भनिरोधक म्हणजे एक छोटीशी स्टिक आहे. जी महिलांसाठी आहे आणि महिलांच्या हातात बसवली की 3 वर्षे त्या प्रेग्नंट होणार नाहीत. हे गर्भनिरोधक आहे, सबडर्मल इम्प्लांट. हे अत्यंत लहान आकाराचं असून माचिसच्या काडीसारखं दिसतं.
advertisement
3/5
आतापर्यंतचे बहुतेक गर्भनिरोधक हे प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले जात होते किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात टोचले जात होते. मात्र हे इम्प्लांट हाताच्या कोपऱ्याजवळील त्वचेच्या अगदी खाली बसवलं जातं. एकदा हे इम्प्लांट बसवलं की 3 वर्षांपर्यंत तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर कोणत्याही साधनाची गरज भासत नाही. पण हे इम्प्लांट बसवण्यासाठी काही मिनिटांची एक छोटी सर्जरी करावी लागते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे करू नये.
advertisement
4/5
हे इम्प्लांट हाताच्या त्वचेखाली बसवल्यानंतर त्यातून अतिशय सूक्ष्म प्रमाणात प्रोजेस्टिन नावाचं हार्मोन्स सतत शरीरात सोडले जातं. हे संप्रेरक प्रामुख्याने दोन प्रकारे काम करते. स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया रोखतं आणि गर्भाशयाच्या मुखाशी असलेला द्राव घट्ट करतं, ज्यामुळे शुक्राणू आत प्रवेश करू शकत नाहीत. जर महिलेला 3 वर्षांच्या आत मूल हवं असेल, तर ती कधीही डॉक्टरांकडे जाऊन हे इम्प्लांट काढून घेऊ शकते. हे काढल्यानंतर काही दिवसांतच नैसर्गिक गर्भधारणेची क्षमता पुन्हा येते. तसंच हे केवळ गर्भधारणा रोखतं, लैंगिक आजारांपासून संरक्षण करत नाही.
advertisement
5/5
राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये तृतीय स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये जसं की जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्येही याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Contraceptive Implant Stick : प्रेग्नन्सी रोखणारी छोटी स्टिक कुठे मिळेल, नवीन गर्भनिरोधक कुठे उपलब्ध आहे?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल