TRENDING:

नवरात्रीचे उपवास करताना तुम्हीही या गोष्टी करता? फायद्याच्या जागी होईल नुकसान

Last Updated:
नवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होण्याची संभावना अधिक आहे.
advertisement
1/7
नवरात्रीचे उपवास करताना तुम्हीही या गोष्टी करता? फायद्याच्या जागी होईल नुकसान
३ ऑक्टोबरपासून भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धुमधडाक्यात नवरात्री साजरी केली जाणार आहे. प्रांतानुसार प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत बदलते. गुजरात, महाराष्ट्र या भागांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे आराधना केली जाते, ठिकठिकाणी गरबा खेळला जातो, तर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजेचे आयोजन केले जाते.
advertisement
2/7
नवरात्रीत भाविक नऊ दिवस उपवासही करतात. या काळात काही लोक फक्त फलाहार करतात, तर काही उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र हे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होण्याची संभावना अधिक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/7
नवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. नकळत झालेल्या काही चुकांमुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासंबंधी टीव्ही9 भारतवर्षने माहिती दिली आहे. यात त्यांनी नवरात्रीचे उपवास करताना कोणत्यी गोष्टी टाळायला हव्या आणि कोणत्या पाळाव्यात याबाबत सांगितले आहे.
advertisement
4/7
उपवासात फळे, राजगिरा आणि उपवासाच्या इतर अनेक गोष्टींचे सेवन केले जाऊ शकते. या दरम्यान हेल्दी पदार्थांचे सेवन करण्यावर भर द्यावा, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषण आणि ऊर्जा मिळत राहिल.
advertisement
5/7
फळांमध्ये सफरचंद, केळे, पपई यांचे सेवन करावे. थोड्या थोड्या फरकाने फळांचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा कायम राहिल. तुम्ही शेंगदाणे, दही असे पदार्थही खाऊ शकता, ज्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल.
advertisement
6/7
नवरात्रीच्या उपवासादरम्यान भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. डिहायड्रेशन झाल्यास आरोग्य आणि त्वचेशी संबंधीत आजार वाढू शकतात. म्हणूनच या काळात मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही नारळपाणी, ताक, फळांचे रस यांचेही सेवन करू शकता.
advertisement
7/7
उपवासादरम्यान वेफर्स यांसारखे तळणीतले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. उपवासादरम्यान भरपूर व्यायाम करू नये. जर तुम्हाला बीपी, डायबिटीजची समस्या असेल तर तुमची औषधे चुकवू नका. इतकंच नाही तर चहा कॉफीचे सतत सेवन करणे टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नवरात्रीचे उपवास करताना तुम्हीही या गोष्टी करता? फायद्याच्या जागी होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल