Weight Loss : भात खाण बंद केल्यावर वजन कमी होतं का? फिटनेस एक्सपर्टने सांगितलं सत्य
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या धावपळीची जीवनशैली आणि जंकफूडचं सेवन इत्यादींमुळे अनेकजणांना वजन वाढीची समस्या जाणवते. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना सुद्धा आमंत्रण मिळतं. तेव्हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काहीजण भात खाण सोडून देतात. भात खाल्ल्याने वजन वाढत होत असा काहींचा समज असतो. मात्र फिटनेस एक्सपर्टने यामागचं नेमकं सत्य काय हे सांगितलं आहे.
advertisement
1/6

सोशल मीडियावर फिटनेस कोच सिमरन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात वजन कमी करण्यासाठी भात खाणं सोडण्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितले की वेट लॉस करताना तुम्ही भात खाऊ शकता. मात्र त्याचे प्रमाण हे मर्यादित असायला हवे.
advertisement
2/6
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार वेट लॉस जर्नी दरम्यान तुम्ही दुपार किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी 10 ते 12 मिनिटांपूर्वी 1 ग्लास पाणी किंवा ताक प्या. मग त्यानंतर सॅलेड खा आणि मग डाळ भाताचे सेवन करा. एक वाटी शिजवलेला भात तुम्ही खाऊ शकता.
advertisement
3/6
भात शिजवताना तो कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा टोपात शिजवा. टोपात शिजवलेला भातातून स्टार्च वेगळा करणं सहज शक्य होत. चपातीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं तर त्या तुलनेत भातात फायबर कमी असतं आणि तो खाल्ल्यावर लवकर पचतो.
advertisement
4/6
तांदळामध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, मॅगनीज, आयरन, फॉलिक ऍसिड, थायमिन आणि फायबर असते. ज्यामुळे भात खाल्ल्यावर शरीराला पुरेसे पोषण सुद्धा मिळते.
advertisement
5/6
तुम्ही तूप, तेल आणि लोणी इत्यादीं सोबत भात खाल्लात तर तुमचं वजन वाढू शकतं. भात नुसता पाण्यात उकळून किंवा भाज्यांसोबत डाळीसोबत खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्यासोबतच व्यायाम आणि शरीराची हालचाल करणं महत्वाचं आहे.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : भात खाण बंद केल्यावर वजन कमी होतं का? फिटनेस एक्सपर्टने सांगितलं सत्य