Rubbing Ice On Face : तुम्हीही चेहऱ्यावर लावताय बर्फ? 90 टक्के लोकांना माहिती नाही याचं नुकसान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेकजण बर्फाचा वापर करतात. सोशल मीडियावरही बर्फाचा वापर करून 'ग्लो' मिळवण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पण, त्वचा रोग तज्ञांच्या मते, दररोज थेट चेहऱ्यावर बर्फ चोळणे त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकते.
advertisement
1/7

2/7
'कोल्ड बर्न'चा धोका: थेट त्वचेवर बर्फ लावल्याने 'कोल्ड बर्न' होऊ शकतो. यामुळे त्वचा लाल होते, त्यात जळजळ होते आणि काहीवेळा त्वचा सोलून निघू शकते.
advertisement
3/7
रक्तवाहिन्यांना नुकसान: थंडीमुळे चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रोज असे केल्याने चेहऱ्यावरील केशिका तुटू शकतात, ज्यामुळे त्वचेवर लाल रेषा दिसू लागतात.
advertisement
4/7
मुरुम आणि पिंपल्स वाढू शकतात: बर्फ मुरुमांवर लगेच सूज कमी करतो, पण जर तुम्ही ते जास्त काळ तिथे ठेवले तर ते मुरुमांमधील बॅक्टेरियाला त्वचेच्या आत ढकलतात, ज्यामुळे पिंपल्सची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
advertisement
5/7
संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक: ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना 'रोसेसिया' सारखा त्वचेचा आजार आहे, त्यांच्यासाठी बर्फ वापरणे खूप धोकादायक आहे. यामुळे त्यांच्या त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ वाढू शकते.
advertisement
6/7
त्वचेचे छिद्र मोठे होतात: बर्फामुळे त्वचेचे पोअर्स लगेच लहान होतात असे मानले जाते, पण दीर्घकाळापर्यंत त्याचा वापर केल्याने हे छिद्र मोठे होऊ शकतात.
advertisement
7/7
योग्य पद्धत काय?: डॉक्टरांच्या मते, बर्फ थेट त्वचेवर लावू नये. त्याऐवजी, बर्फ एका मऊ सुती कपड्यात गुंडाळा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर 1-2 मिनिटे लावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rubbing Ice On Face : तुम्हीही चेहऱ्यावर लावताय बर्फ? 90 टक्के लोकांना माहिती नाही याचं नुकसान!