Chicken : तुम्हाला माहितीये का, चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग कोणता? एका माणसाने किती खाल्लं पाहिजे?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
हिवाळ्यात थंडीचा तडाखा वाढल्याने मांसाहार करण्याला अधिक प्राधान्य दिलं जात. यात साधारणपणे चिकन, मटण, मासे, अंडी इत्यादींचा समावेश असतो. या दिवसात मांसाहारी चिकन मटणावर तुटूनच पडतात. तेव्हा चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग कोणता आणि एका व्यक्तीने दिवसाला किती चिकन खायला हवं याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

कोरा या साईटवर तेथील युझर्सना चिकनमध्ये किती प्रोटीन असते असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना मुझम्मील खान या यूझरने 100 ग्रॅम बोनलेस चिकनमध्ये सुमारे 27 ते 31 ग्रॅम प्रथिने असतात असे सांगितले. तसेच 100 ग्रॅम चिकनमध्ये 160 ते 170 कॅलरीज असतात असे सांगितले.
advertisement
2/5
चिकनमधील प्रत्येक भाग हा पौष्टिकच असतो मात्र यातील सर्वात पौष्टिक भाग कोणता हे तुमच्या विशिष्ट आहाराच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून असू शकते.
advertisement
3/5
कोरावरील दीक्षा नावाच्या युझरने सांगितले की, सामान्यपणे चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग हा चिकन ब्रेस्ट असतो. याभागाला बोनलेस चिकन असे देखील म्हणतात आणि इतर भागांच्या तुलनेत चिकन ब्रेस्टमध्ये चरबी कमी असते. चिकन ब्रेस्ट हे विशेषतः प्रथिने, बी जीवनसत्त्वे, फॉस्फरस आणि सेलेनियमने समृद्ध आहेत.
advertisement
4/5
चिकन ब्रेस्टच्या तुलनेत चिकनच्या मांड्यांमध्ये किंचित जास्त चरबी आढळते. तसेच यामध्ये प्रथिने, ब जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील चांगल्या प्रमाणात असतात. मांडीतील गडद रंगाच्या मांसामध्ये जास्त लोह आणि जस्त असते.
advertisement
5/5
चिकन विंग्समध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे जर तुम्ही दररोजच्या जेवणातील कॅलरीज कमी करण्याचा विचार करत असाल तर चिकन विंग्स हा तुमच्यासाठी आरोग्यदायी पर्याय ठरत नाही. चिकन ड्रमस्टिक्समध्ये ब्रेस्टच्या तुलनेत किंचित जास्त चरबी असते परंतु यात प्रथिने आणि पोषक तत्वांचा चांगला समतोल असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chicken : तुम्हाला माहितीये का, चिकनमधील सर्वात पौष्टिक भाग कोणता? एका माणसाने किती खाल्लं पाहिजे?