Drinking Water While Eating : जेवताना पाणी का पिऊ नये, जेवणाच्या मधे मधे पाणी प्यायल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Do Not Drink While Eating : जेवताना पाणी पिणं ही साधी सवय वाटली तरी तिचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. पचन नीट न झाल्यास अनेक आजारांची सुरुवात होते.
advertisement
1/7

ए जेवताना पाणी पिऊ नको, जेवणाच्या आधी किंवा नंतर पी... असा सल्ला तुम्हाला खूप जण देत असतील. पण असं का? जेवताना मधे मधे पाणी प्यायलं तर त्याचा काय परिणाम होतो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. (AI Generated Image)
advertisement
2/7
अनेकांना हा सल्ला अंधश्रद्धा वाटतो, पण आधुनिक वैद्यकीय संशोधन आणि आयुर्वेद दोन्ही यामागे शास्त्रीय कारणे सांगतात. जेवताना पाणी पिण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.
advertisement
3/7
जेवताना आपण पाणी पितो तेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ज्युस आणि पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स पातळ होतात. पाणी जास्त प्रमाणात घेतल्यास अन्नाचे योग्य विघटन होत नाही. अन्न अर्धवट पचतं आणि पोटात जडपणा, आंबट ढेकर, गॅस अशा तक्रारी सुरू होतात. (AI Generated Image)
advertisement
4/7
आयुर्वेदानुसार पचनासाठी जठराग्नी महत्त्वाचा असतो. जेवताना जास्त पाणी पिल्यास हा जठराग्नी मंदावतो. पाणी प्यायल्यामुळे पोटाचं तापमान थोडंसं कमी होतं, पचनाची गती मंदावते. त्यामुळे अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये योग्य प्रकारे मिळत नाहीत.
advertisement
5/7
जेवताना पाणी पिण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये अॅसिडिटी, ब्लोटिंग, गॅस आणि अपचन या समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात. अर्धवट पचलेले अन्न आतड्यांमध्ये जाऊन किण्वन प्रक्रिया वाढवते, ज्यामुळे वायू तयार होतो. (AI Generated Image)
advertisement
6/7
पचन नीट न झाल्यास शरीरातील चयापचय मंदावतो. अन्नातील पोषक घटक योग्य पद्धतीने शोषले जात नाहीत आणि चरबी साठण्याची प्रक्रिया वाढते. त्यामुळे जेवताना सतत पाणी पिणं अप्रत्यक्षपणे वजन वाढीस कारणीभूत ठरू शकते.
advertisement
7/7
याचा अर्थ असा नाही की जेवताना अजिबातच पाणी पिऊ नये. फार कोरडं अन्न अडकल्यास 1-2 घोट कोमट पाणी घेणं चालतं. ते पचनसंस्थेला धक्का देत नाही आणि अन्न पचण्यास मदत करते. मात्र भरपूर प्रमाणात पाणी टाळावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Drinking Water While Eating : जेवताना पाणी का पिऊ नये, जेवणाच्या मधे मधे पाणी प्यायल्याने काय होतं?