Egg : अंडी फ्रीजमध्ये ठेवायची की नाही? काय आहे योग्य पद्धत, 90 टक्के गृहिणींना हे माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
advertisement
1/11

अंड बहुतांश घरांमध्ये खाल्लं जातं. ते कधी नाष्टाला तर कधी जेवणासाठीही वापरलं जातं. अंड्यापासून बनणाऱ्या असंख्य रेसीपिज आहेत. त्यासाठी लोक एकदाच एक ते दोन डझन अंडी मागवतात. पण अंड ठेवायचं कुठे? हा प्रश्न अनेक गृहिणींचा असतो. काहीजण ती फ्रीजमध्ये ठेवतात, तर काही लोक ती बाहेर, सामान्य तापमानावर ठेवण्यास प्राधान्य देतात. या साध्या प्रश्नाभोवती अनेक तर्क-वितर्क आहेत.
advertisement
2/11
अंडी ताजी राहावीत आणि त्यांना कोणताही जीवाणू संसर्ग होऊ नये, यासाठी स्टोरेजची योग्य पद्धत कोणती, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
3/11
भारतातील वाढत्या तापमानामुळे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. मग विज्ञान ाबद्दल काय सांगते आणि अमेरिकासारख्या देशात कोणते नियम पाळले जातात?
advertisement
4/11
संशोधन काय म्हणते?फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजीमध्ये 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, जर अंडी साधारण 25°C तापमानावर साठवली गेली, तर त्यांच्यात साल्मोनेला टायफीम्यूरियम (Salmonella Typhimurium) नावाचा धोकादायक जीवाणू वाढू लागतो.याउलट, अंड्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास या जीवाणूंची वाढ मंदावते. यामुळे, अंड्यांना जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी आणि बॅक्टेरियाचा धोका कमी करण्यासाठी तापमान स्थिर आणि कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/11
अमेरिका आणि भारताच्या नियमांत फरक का?अंडी साठवण्याच्या पद्धतीत देशानुसार फरक आढळतो आणि याचे मुख्य कारण आहे स्वच्छता प्रक्रिया.
advertisement
6/11
अमेरिकेतील नियमअमेरिकेत अंडी विकण्यापूर्वी त्यांना चांगले सॅनिटाइज (धुऊन) केले जाते. या प्रक्रियेत अंड्याच्या कवचावरील नैसर्गिक संरक्षक थर निघून जातो.कवच संवेदनशील झाल्यामुळे जीवाणू सहजपणे आत प्रवेश करू शकतात. त्यामुळे, अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये, जीवाणूंचा धोका कमी करण्यासाठी अंड्यांना 4°C (40°F) किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर फ्रीजमध्ये ठेवणे अनिवार्य आहे.
advertisement
7/11
भारतातील स्थितीभारतात अंडी साधारणपणे न धुताच विकली जातात. यामुळे, अंड्याच्या कवचावरील नैसर्गिक थर सुरक्षित राहतो, जो अंड्याला बाहेरील जीवाणूंपासून वाचवतो. यामुळे, भारतातील अंडी सामान्य खोलीच्या तापमानावरही ठेवता येतात.
advertisement
8/11
अंडी योग्य प्रकारे कशी साठवावीत?जरी भारतात अंडी बाहेर ठेवली जात असली तरी, सुरक्षित आणि ताजी अंडी खाण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाभारतातील अनेक भागांमध्ये तापमान खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, अंडी लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे चांगले.
advertisement
9/11
अंडी कधीही फ्रीजच्या दोन दारांमध्ये ठेवू नयेत, कारण येथे तापमान वारंवार बदलत राहते. त्याऐवजी, त्यांना आतील शेल्फवर ठेवा, जिथे तापमान स्थिर राहते.USDA नुसार, फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी दोन तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानावर बाहेर ठेवू नयेत.जर अंड्याला तडा (Crack) गेला असेल किंवा त्यातून दुर्गंध (Bad Smell) येत असेल, तर ते न वापरता लगेच फेकून द्यावे.
advertisement
10/11
एकंदरीत, अंडी कोठे साठवायची हे तापमान आणि स्वच्छतेच्या पद्धतीवर अवलंबून असते. सुरक्षिततेसाठी, जास्त तापमान असलेल्या वातावरणात अंड्यांना फ्रीजमध्ये ठेवणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.
advertisement
11/11
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Egg : अंडी फ्रीजमध्ये ठेवायची की नाही? काय आहे योग्य पद्धत, 90 टक्के गृहिणींना हे माहितच नाही