TRENDING:

गुलाब जामून बासुंदी कधी ट्राय केलीत का? इथं मिळतेय 15 प्रकारची टेस्ट

Last Updated:
'द बासुंदीवाला' येथे बासुंदीला मोठी मागणी असते. या ठिकाणी 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत बासुंदी मिळते.
advertisement
1/7
गुलाब जामून बासुंदी कधी ट्राय केलीत का? इथं मिळतेय 15 प्रकारची टेस्ट
गोडधोड खायचं म्हटलं की अनेकांना बासुंदी आवडते. प्रत्येक शहरात एखादं बासुंदी मिळणारं प्रसिद्ध ठिकाण असतंच. आतापर्यंत आपण केसर पिस्ता किंवा ड्रायफ्रुट घातलेली बासुंदी खाल्ली असेल.
advertisement
2/7
<a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> येथील 'द बासुंदीवाला' यांच्याकडे तब्बल 15 प्रकारच्या बासुंदी मिळतात. शहरातील कॅनॉट परिसरात प्रियांका गरडवाल हे दुकान चालवतात. बासुंदीच्या चवीमुळे खवय्यांची नेहमीच या ठिकाणी गर्दी असते.
advertisement
3/7
&quot;मला एक व्यवसाय सुरू करायचा होता. माहिती घेतली. रिसर्च केला आणि त्यानंतर मी फूड व्यवसाय करायचं ठरवलं. वेगवेगळ्या पदार्थांबाबत विचार करून शेवटी बासुंदीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/7
बाजारामध्ये बासुंदी उपलब्ध होते. पण त्यामध्ये वेगवेगळे प्रकार नसतात. त्यासाठी बासुंदीत वेगळे प्रकार आणण्याचा निर्णय घेतला. 'द बासुंदीवाला' या नावानं दुकान सुरू केलं,&quot; असं प्रियांका गरडवाल सांगतात.
advertisement
5/7
'द बासुंदीवाला' यांच्याकडे तब्बल 15 प्रकारच्या बासुंदी मिळतात. यात रेग्युलर बासुंदी, केसर पिस्ता, चॉकलेट, बटरस्कॉच, रोझ बासुंदी, स्ट्रॉबेरी बासुंदी, गुलाब जामुन बासुंदी, अंगुरी बासुंदी, लस्सी बासुंदी, मँगो बासुंदी, रसगुल्ला बासुंदी, ड्रायफ्रूट मिक्स बासुंदी, राजभोग बासुंदी, सिताफळ बासुंदी, शुगर फ्री बासुंदी अशा 15 प्रकारच्या बासुंदींचा समावेश आहे.
advertisement
6/7
प्रियांका गरडवाल यांच्या 'द बासुंदीवाला' येथे बासुंदीला मोठी मागणी असते. या ठिकाणी 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत बासुंदी मिळते. तसेच किलोवरही बासुंदी मिळते. त्यामुळे विविध प्रकारच्या बासुंदी खायच्या असतील तर छत्रपती संभाजीनगरमधील या ठिकाणाला भेट द्यावीच लागेल.
advertisement
7/7
&quot;मी घरी फक्त ड्रायफूट बासुंदी खाल्ली होती. पण या ठिकाणी तब्बल 15 प्रकारच्या बासुंदी आहेत. मी या ठिकाणी सर्व बासुंदी खाल्ली आहे. मला यांची चॉकलेट बासुंदी आणि बटरफ्लाय बासुंदी खूप आवडली&quot;, असे ग्राहक सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
गुलाब जामून बासुंदी कधी ट्राय केलीत का? इथं मिळतेय 15 प्रकारची टेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल