'दोन्ही मित्रांची लग्न झाली अन् अचानक...' ज्ञानदा रामतीर्थकरची फिल्मी लव्हस्टोरी; नवऱ्याने हटक्या स्टाइलने केलेलं प्रपोज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dnyanada Ramtirthkar Love Story: डिसेंबर २०२५ मध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा पार पडला, पण तिचा हा 'मिस्टर राईट' नक्की आहे तरी कोण? या प्रश्नाने चाहत्यांना भंडावून सोडलं होतं.
advertisement
1/7

मराठी मालिका </a>विश्वात आपल्या सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या सातासमुद्रापार नाही, तर प्रेमाच्या अथांग डहात बुडाली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' फेम ज्ञानदा लवकरच बोहल्यावर चढणार आहे." width="1080" height="1349" /> मराठी मालिका विश्वात आपल्या सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या सातासमुद्रापार नाही, तर प्रेमाच्या अथांग डहात बुडाली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' फेम ज्ञानदा लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
advertisement
2/7
डिसेंबर २०२५ मध्ये तिचा साखरपुडा पार पडला, पण ज्ञानदाचा हा 'मिस्टर राईट' नक्की आहे तरी कोण? या प्रश्नाने चाहत्यांना भंडावून सोडलं होतं. अखेर ज्ञानदाने स्वतःच आपल्या प्रेमाची कबुली देत सर्वांना दिलासा दिला आहे.
advertisement
3/7
ज्ञानदाचा होणारा नवरा हर्षद आत्माराम हा सिनेसृष्टीतील एक नामवंत सिनेमॅटोग्राफर (DOP) आहे. या दोघांच्या प्रेमाची गाडी २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंग दरम्यान रुळावर आली. तिथे त्यांची पहिली भेट झाली.
advertisement
4/7
हर्षद तेव्हा मुंबईत स्थायिक नव्हता, तो कामानिमित्त यायचा. पण ज्ञानदाच्या मनात मात्र 'काहीतरी' शिजत होतं. हर्षद मुंबईतून तिला न भेटता गेला, की ज्ञानदाची चिडचिड व्हायची. इथूनच एका सुंदर नात्याची गुंफण सुरू झाली.
advertisement
5/7
२०१९ चं ते वर्ष या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. हर्षदच्या दोन जवळच्या मित्रांची लग्नं झाली होती. या लग्नांना ज्ञानदाही हर्षदसोबत गेली होती. तिथून घरी परतत असताना, गाडीत हर्षदने अत्यंत कॅज्युअल पण रोमँटिक स्टाईलमध्ये ज्ञानदाला विचारलं, "अगं ज्ञानदा, माझ्या दोन्ही मित्रांची लग्नं झाली... आता काय, चल आपण सुद्धा लग्न करून टाकूया!" अगदी अनपेक्षितपणे हर्षदने ज्ञानदाला प्रपोज केलं होतं.
advertisement
6/7
ज्ञानदा आणि हर्षद यांच्या वयात ७ वर्षांचं अंतर आहे. ज्ञानदा जेव्हा हर्षदच्या प्रेमात पडली, तेव्हा ती अवघ्या २२ वर्षांची होती. हर्षदला वाटत होतं की तिने थोडा वेळ घ्यावा, विचार करावा. पण ज्ञानदा मात्र ठाम होती. "मला याच्याशीच लग्न करायचंय," हे तिने मनाशी आधीच पक्कं केलं होतं. त्यामुळे जेव्हा हर्षदने मागणी घातली, तेव्हा 'नाही' म्हणण्याचा प्रश्नच उरला नव्हता.
advertisement
7/7
हर्षद सांगतो की, ज्ञानदाचा काळजी घेणारा स्वभाव त्याला सर्वात जास्त आवडला. ती केवळ त्याच्यावरच नाही, तर तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसावर भरभरून प्रेम करते. तिची ही आपुलकीच हर्षदच्या काळजाला स्पर्श करून गेली. आता जवळपास ६-७ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर, हे क्युट कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दोन्ही मित्रांची लग्न झाली अन् अचानक...' ज्ञानदा रामतीर्थकरची फिल्मी लव्हस्टोरी; नवऱ्याने हटक्या स्टाइलने केलेलं प्रपोज