IND vs PAK : ट्रॉफी चोर मैदान सोडून पळाले, पाकिस्तान क्रिकेटने साईन केलं स्वत:चंच 'डेथ वॉरंट'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेटला पाठिंबा म्हणून पाकिस्तान भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही.
advertisement
1/9

15 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता. पण पाकिस्तान हा सामना खेळणार नसल्याचं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे. असं असलं तरी पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमधले त्यांचे उरलेले सामने खेळणार आहे.
advertisement
2/9
बांगलादेशने सुरक्षेचं कारण देत त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेमध्ये खेळवण्याची मागणी केली, पण ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली, त्यामुळे बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवरच बहिष्कार टाकला. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/9
पाकिस्तानचा हा निर्णय म्हणजे त्यांनी स्वत:च त्यांच्या क्रिकेटचा डेथ वॉरंट साईन केल्याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर आयसीसीकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/9
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धांमधले सामने तटस्थ ठिकाणी खेळण्याचा करार झाला आहे. हा करार आयसीसी, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात झाला आहे, ज्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही सही आहे.
advertisement
5/9
कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसी पाकिस्तानवर निलंबन किंवा दंडात्मक कारवाई करू शकते, ज्यामुळे आयसीसीकडून त्यांना मिळणारा महसूलही कमी केला जाऊ शकतो किंवा रोखलाही जाऊ शकतो.
advertisement
6/9
आयसीसीला भारत-पाकिस्तान सामन्यातून सगळ्यात जास्त महसूल मिळतो. हाच महसूल आयसीसी इतर देशांच्या बोर्डांना देते, पण आता भारत-पाकिस्तान सामनाच होणार नसल्यामुळे आयसीसीचा महसूल कमी होईल, त्यामुळे इतर बोर्डांनाही कमी पैसे मिळतील.
advertisement
7/9
महसूल कमी झाल्यामुळे आयसीसीचे सदस्य देश पाकिस्तानविरुद्ध एक होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बहुमत मिळवू शकतात, या परिस्थितीमध्ये आयसीसीला पाकिस्तानवर कारवाई करावी लागू शकते.
advertisement
8/9
इतर देशांची बोर्ड पाकिस्तानच्या विरोधात गेली, तर ते त्यांच्या देशाच्या खेळाडूंना पीएसएलमध्ये खेळण्याची परवानगीही देणार नाहीत, ज्याचा सर्वाधिक आर्थिक फटका पीसीबीला बसेल.
advertisement
9/9
आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही देशाचं सरकार क्रिकेट बोर्डामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पाकिस्तान भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, हे तर पाकिस्तान सरकारनेच अधिकृतरित्या जाहीर केलं आहे, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर निलंबनाची कारवाईही होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : ट्रॉफी चोर मैदान सोडून पळाले, पाकिस्तान क्रिकेटने साईन केलं स्वत:चंच 'डेथ वॉरंट'!