TRENDING:

सोनाली राऊतचा गेम ओव्हर! अ‍ॅटिट्यूड नडला की टास्कमधली आळस? ग्लॅमरस क्वीन बिग बॉसमधून आऊट

Last Updated:
Sonali Raut is out of Bigg Boss House: घरातील ग्लॅमरचा तडका मानली जाणारी सोनाली राऊत आता या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
advertisement
1/8
अ‍ॅटिट्यूड नडला की टास्कमधली आळस? ग्लॅमरस क्वीन सोनाली राऊत बिग बॉसमधून आऊट
'बिग बॉस मराठी ६' चं घर म्हणजे वादाचं भांडार आणि अनपेक्षित ट्विस्टचा अड्डा! इथे कधी कोणाचं नशीब फळफळेल आणि कधी कोणाचा पत्ता कट होईल, याचा नेम नाही. पहिल्या आठवड्यातील संथ गतीनंतर आता या खेळाने चांगलाच वेग पकडला आहे.
advertisement
2/8
दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलची एक्झिट झाल्यानंतर, तिसऱ्या आठवड्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण समोर आलेली बातमी चाहत्यांना सुन्न करणारी आहे. घरातील ग्लॅमरचा तडका मानली जाणारी सोनाली राऊत आता या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
advertisement
3/8
सोनाली राऊत ही एक अशी स्पर्धक होती, जिच्याकडे स्वतःची वेगळी स्टाईल आणि मोठा चाहता वर्ग होता. मात्र, बिग बॉसच्या घरात फक्त ग्लॅमर चालत नाही, तर तिथे कष्टाची आणि खेळाचीही गरज असते.
advertisement
4/8
आजच्या एपिसोडच्या सुरूवातीला रितेशने दिपाली सय्यद आणि प्रभू शेळकेला ते सेफ असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने तीन-तीनच्या टीममध्ये नॉमिनेटेड स्पर्धकांना टास्क रूममध्ये बोलावलं.
advertisement
5/8
पहिल्या टीममध्ये रुचिता, विशाल आणि सोनाली होते, तर दुसऱ्या टीममध्ये प्राजक्ता, करण आणि ओमकार होते. अखेर सोनाली आणि ओमकार डेंजर झोनमध्ये आले. यानंतर रितेशने सोनाली एलिमिनेट होत असल्याचं जाहीर केलं.
advertisement
6/8
सोनालीला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात तिच्या कॅज्युअल वागण्याचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. विशेषतः 'शेणाचं दार अन् मेणाचं दार' या कॅप्टन्सी टास्कमध्ये तिने जो नन्नाचा पाढा लावला, तो प्रेक्षकांना आणि खुद्द रितेश भाऊंनाही पटलेला नाही.
advertisement
7/8
मागील भागात रितेश देशमुखने सोनालीची ज्या पद्धतीने कानउघाडणी केली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. "सोनाली, हा तुमचा अ‍ॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवा, या घरात सगळे स्पर्धक समान आहेत. टास्क खेळायला आला आहात ना, मग नखरे कशासाठी?" अशा शब्दांत रितेशने तिला खडसावलं होतं. इतकंच नाही, तर "पुढच्या वेळी घराबाहेर काढेन," असा दमही भरला होता. रितेशचे ते शब्द आता शब्दशः खरे ठरले असून, सोनालीला चक्क घराबाहेर जावं लागलं आहे.
advertisement
8/8
या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामकर यांसारख्या तगड्या नावांचा समावेश होता. या सर्व दिग्गजांमध्ये सोनाली प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आणि मतं मिळवण्यात कमी पडली. तिचा अतरंगी ड्रामा प्रेक्षकांसाठी सुरुवातीला मजेशीर होता, पण खेळाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तिची उदासीनता चाहत्यांना खटकली आणि त्यांनी तिला मतं देणं थांबवलं.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सोनाली राऊतचा गेम ओव्हर! अ‍ॅटिट्यूड नडला की टास्कमधली आळस? ग्लॅमरस क्वीन बिग बॉसमधून आऊट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल