भारताविरुद्धच्या T20 वर्ल्ड कप सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, मॅचच्या 2 पॉईंट्सचं काय होणार? मोठी अपडेट समोर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यातून पाकिस्तानने माघार घेतली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यावर आपण बहिष्कार टाकत असल्याचं पाकिस्तान सरकारने जाहीर केलं आहे.
advertisement
1/8

काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली, तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळायचं का नाही? याबाबाबत विचारणा केली.
advertisement
2/8
मोहसीन नक्वी यांनी भेट घेतल्यानंतर अखेर पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाठिंबा म्हणून पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.
advertisement
3/8
बांगलादेश सरकारने भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळायला नकार दिला, तसंच आपले सामने श्रीलंकेमध्ये आयोजित केले जावेत, अशी मागणी केली. पण आयसीसीने ही मागणी फेटाळली, त्यामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाहेर झाली.
advertisement
4/8
बांगलादेशला पाठिंबा म्हणून आता पाकिस्ताननेही टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, पण या निर्णयाचा फटका पाकिस्तानला बसणार आहे.
advertisement
5/8
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला श्रीलंकेतल्या कोलंबोमध्ये आर. प्रेमदासा स्टेडियमवर सामना होणार होता. पण आता पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकल्यामुळे भारताला 2 पॉईंट्स मिळणार आहेत.
advertisement
6/8
आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या टीमने सामना खेळायला नकार दिला, तर त्या सामन्याचे सगळे पॉईंट्स दुसऱ्या टीमला दिले जातात. याआधी 2003 च्या वर्ल्ड कपमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती.
advertisement
7/8
2003 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने झिम्बाब्वेमध्ये आणि न्यूझीलंडने केनियामध्ये खेळायला नकार दिला होता, त्यामुळे झिम्बाब्वे आणि केनियाला मॅचचे 2-2 पॉईंट्स देण्यात आले होते.
advertisement
8/8
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात खेळायला नकार दिल्यामुळे आता टीम इंडियाला या सामन्याचे 2 पॉईंट्स मिळणार आहेत. याशिवाय भारताचे सामने युएसए, नामिबिया आणि नेदरलँड्सविरुद्ध होणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
भारताविरुद्धच्या T20 वर्ल्ड कप सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, मॅचच्या 2 पॉईंट्सचं काय होणार? मोठी अपडेट समोर