Sprouts : 'मोड आलेले कडधान्य कच्चे खाऊ नका', कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितला काय होतो परिणाम
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Sprouts : अनेकांना मोड आलेले कडधान्य कच्चे खायला आवडतात. पण याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/5

बऱ्याच लोकांना मोड आलेले कडधान्य खायची सवय असते. काही जण ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याला कडधान्य खातात तर काही जणांच्या डाएटचा एक भाग.
advertisement
2/5
बहुतेकांना मोड आलेले कडधान्य कच्चे खायची सवय असते. कच्च्या स्प्राउट्समध्ये भरपूर पोषण असते. कच्च्या कडधान्यात फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
advertisement
3/5
पण आयुर्वेदात मोड आलेले कडधान्य कच्चे खाणं चांगलं नसल्याचं सांगितलं आहे. कच्च्या स्प्राउट्समध्ये बॅक्टेरिया, एन्झाईम असू शकतात.
advertisement
4/5
कोल्हापूरचे डॉक्टर भूषण काळे यांनी सांगितलं की, आयुर्वेदात मोड आलेली कच्ची मटकी कृमिकर सांगितली आहे. म्हणजे याच्यामुळे जंत होतात
advertisement
5/5
त्यामुळे जीमला जाणारे किंवा ड्राय सलाड घेणाऱ्यांना आम्ही सल्ला देतो की त्याला तुपाची फोडणी द्या. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले गुणधर्म मिळतात आणि पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत, असा सल्ला डॉ. काळे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Sprouts : 'मोड आलेले कडधान्य कच्चे खाऊ नका', कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितला काय होतो परिणाम