TRENDING:

कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का? टेस्ट लयभारी पण मिळतोय कुठं?

Last Updated:
हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते. विशेष म्हणजे हीच याची खासियत आहे.
advertisement
1/7
कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का? टेस्ट लयभारी पण मिळतोय कुठं?
रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते चटकदार रेस्टॉरंटपर्यंत समोसा तुम्हाला हव्या त्या ठिकाणी खायला मिळू शकतो. असाच चटकदार आणि चवदार समोसा मिळण्याचे ठिकाण प्रत्येक गावामध्ये दिसून येते. <a href="https://news18marathi.com/maharashtra/beed/">बीडमधील</a> स्टेडियम रोड परिसरात एक रेस्टॉरंट असून येथील समोसा खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
2/7
बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये अनेक खवय्यांना हवेहवेसी वाटणारी स्नॅक सेंटर आणि रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी अनेक विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. यामधील स्वराष्ट्र स्वीट होममध्ये मिळणाऱ्या गरमागरम समोस्याची चव काही न्यारीच आहे. विशेष म्हणजे हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते. विशेष म्हणजे हीच याची खासियत आहे.
advertisement
3/7
बीड स्टेडियम रोड परिसरामध्ये एका छोट्याशा गाळ्यामध्ये 2002 च्या सुमारास या स्वीट होमच्या व्यवसायाला योगेश पडझरिया आणि त्यांच्या भावाने सुरुवात केली. सुरुवातीला दिवसाकाठी पाच ते सहा किलो बटाटा समोसा बनवण्यासाठी लागत होता.
advertisement
4/7
त्यावेळी 50 ते 100 एवढ्या सामोस्यांची विक्री देखील होत होती. मात्र ग्राहकांना या समोस्याची चव चटकदार आणि चवदार लागू लागली आणि हळूहळू खवय्यांची गर्दी वाढतच गेली, असे पडझरिया सांगतात.
advertisement
5/7
विशेष म्हणजे ज्यावेळी समोस्यासाठी बटाट्याची भाजी बनवतात. त्यावेळी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या लाल मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट याच मिश्रणात टाकली जाते. त्यावरून लिंबू पिळून हे सर्व मिश्रण एकत्रित कालवले जाते.
advertisement
6/7
यात कांदा लसूण वापरत नाहीत. त्यानंतर मिश्रण तयार करून समोसा बांधला जातो. मग हा समोसा गरमागरम तेलात खुसखुशीत तळला जातो. हा समोसा हिरवी चटणी आणि गोड आंबट पाणी देऊन ग्राहकांना दिला जातो.
advertisement
7/7
सध्या दिवसाकाठी 20 किलो बटाट्याचे मिश्रण हे समोसा बनवण्यासाठी लागते. तर दिवसाला 300 ते 400 समोस्यांची विक्री होते. आता या समोसाचा दर हा महागाईमुळे वीस रुपये करावा लागलाय, असे समोसा विक्रेते योगेश पडझरिया सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का? टेस्ट लयभारी पण मिळतोय कुठं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल