इथं 40 रुपयांमध्ये घ्या प्रसिद्ध समोसा राईसचा आस्वाद; खवय्यांची असते मोठी गर्दी PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाड्याचे व्यापारी केंद्र असलेल्या जालना शहराला देखील अशीच वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभलेली आहे. जालना शहरामध्ये रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये समोसा राईस हा पदार्थ लोकप्रिय आहे.
advertisement
1/6

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतामध्ये भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती इत्यादी बाबतीमध्ये विविधता आढळते. प्रत्येक शहराची वेगळी अशी एक खाद्य संस्कृती असते. त्याचबरोबर शहरात मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये देखील आपल्याला वैविध्य आढळते.
advertisement
2/6
मराठवाड्याचे व्यापारी केंद्र असलेल्या <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहराला देखील अशीच वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभलेली आहे. जालना शहरामध्ये रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये समोसा राईस हा पदार्थ लोकप्रिय आहे. हा समोसा राईस खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
3/6
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कैवल्य स्टॉल मिळणारा समोसा राईस जालनेकरांच्या पसंतीस उतरला आहे. 42 वर्षीय बालाजी घोडके यांनी 2018 मध्ये मिसळ पाव आणि रस्सा पोह्याचा हा स्टॉल सुरू केला.
advertisement
4/6
त्यांना मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्यांनी एक एक खाद्यपदार्थ आपल्या स्टॉलवर वाढवत नेला. आता त्यांच्याकडे तब्बल 6 खाद्यपदार्थ मिळतात. यामध्ये समोसा राईस (40 रुपये) मिसळपाव (30 रुपये ) वडापाव(10 रुपये) रस्सा कचोरी (25 रुपये) रस्सा समोसा (25 रुपये) रस्सा पोहे (25 रुपये) इत्यादी खाद्यपदार्थ मिळतात.
advertisement
5/6
समोसा राईससाठी वापरण्यात येणारा राईस हा बासमती तांदूळ असतो. हा राईस बनवण्यासाठी काही घरगुती आणि काही बाजारात मिळणाऱ्या मसाल्याचा वापर केला जातो. मटकी रस्सा हा घरच्याच मसाल्यांपासून बनवण्यात येतो. त्याचप्रमाणे समोसे देखील घरीच तळले जातात. समोसा प्लेटमध्ये चुरून त्यावरती खमंग असा राईस टाकला जातो. त्यावरती तर्रीदार मटकीचा रस्सा, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि वरून बारीक शेव अशा पद्धतीने समोसा राईस तयार होते.
advertisement
6/6
केवळ 40 रुपयांमध्ये हा समोसा राईस मिळतो. दररोज 80 ते 100 प्लेट समोसा राईसची विक्री घोडके करतात. सगळ्या खाद्यपदार्थांचा मिळून दिवसभराची 5 हजारांची उलाढाल होते, असं बालाजी घोडके यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
इथं 40 रुपयांमध्ये घ्या प्रसिद्ध समोसा राईसचा आस्वाद; खवय्यांची असते मोठी गर्दी PHOTOS