तोंडाला मास्क, पूर्ण बाह्यांचा शर्ट डोक्यावर टोपी! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शिवम दुबेचा रेल्वेनं प्रवास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनल जिंकली. शिवम दुबेने न्यूझीलंडविरुद्ध 26 धावा केल्या. फ्लाइट न मिळाल्याने शिवमने ट्रेनने प्रवास केला. त्याने सामान्य प्रवास करून चाहत्यांचे मन जिंकले.
advertisement
1/6

वर्ल्ड कप फायनल खेळून टीम इंडियाने टॉफी मिळवली. 8 बॉलमध्ये 26 धावा करून शिवमने न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले. आपल्या खेळासोबत शिवम आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. शिवमने वर्ल्ड कपचा सामना झाल्यानंतर विमानाऐवजी थेट ट्रेननं मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. ट्रेननं वरच्या बर्थवरुन प्रवास करून तो मुंबईत आला. एक सेलिब्रिटी असूनही त्याने सर्वसामान्य लोकांसारखा प्रवास केला.
advertisement
2/6
शिवमने केलेल्या ट्रेन प्रवासाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अहमदाबादमध्ये विजयाचा जल्लोष झाल्यानंतर मुंबईला येण्यासाठी एकही फ्लाइट मिळत नव्हती. घरी ४ वर्षांचा मुलगा अयान आणि २ वर्षांची मुलगी मेविश वाट पाहत होते. मुलांच्या ओढीने शिवमने वेळ न घालवता रेल्वेने येण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/6
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिवम म्हणाला, "बस किंवा कारने येणं खूप वेळखाऊ होतं, फ्लाइटचे तिकीट नव्हते. ट्रेननं लवकर पोहोचता येईल म्हणून पहाटे ५:१० ची ट्रेन पकडण्याचं ठरवलं. थर्ड एसीचं तिकीट उपलब्ध होतं, ते बूक केलं आणि प्रवास केला."
advertisement
4/6
टी-२० वर्ल्ड कप जिंकलेला खेळाडू ट्रेनमध्ये दिसला तर गोंधळ होणार याची कल्पना होती. त्यामुळे शिवमने पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता. तो ट्रेन सुटण्यापूर्वी फक्त ५ मिनिटं आधी डब्यात शिरला आणि थेट वरच्या बर्थवर जाऊन झोपला.
advertisement
5/6
जेव्हा टीटीई तिकीट तपासायला आला, तेव्हा एक मजेशीर किस्सा घडला. टीटीईने यादीत नाव बघून विचारलं, "शिवम दुबे? क्रिकेटर का?" त्यावर शिवमची पत्नी अंजुमने मोठ्या हुशारीने उत्तर दिलं, नाही,.. तो इथे कुठून येईल? अंजुमच्या या उत्तरामुळे टीटीईचा संशय मिटला आणि शिवमची ओळख गुप्त राहिली.
advertisement
6/6
प्रवास सुखाचा झाला तरी दिवसा ढवळ्या बोरीवली स्टेशनवर उतरणं कठीण होतं. तिथे चाहत्यांची गर्दी झाल्यास अडचण येऊ शकली असती. त्यामुळे शिवमने रेल्वेतूनच पोलिसांना फोन करून मदतीची विनंती केली. पोलीस आधी विमानतळावर गेले होते, पण शिवम ट्रेनने येतोय हे ऐकून त्यांनाही धक्का बसला. अखेर पोलीस बंदोबस्तात शिवम सुखरूप आपल्या घरी पोहोचला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
तोंडाला मास्क, पूर्ण बाह्यांचा शर्ट डोक्यावर टोपी! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शिवम दुबेचा रेल्वेनं प्रवास