Kitchen Tips : लसूण की कांदा, फोडणीत पहिलं काय टाकायचं? क्रम चुकला तर बिघडते चव
- Published by:Priya Lad
Last Updated:
Garlic Onion Tadka : फोडणी करताना कोणते पदार्थ कधी घालावेत यावरही फोडणी कशी होईल आणि त्या पदार्थाची चव अवलंबून आहे.
advertisement
1/5

फोडणी म्हणजे पदार्थाचा पाया म्हणायला हरकत नाही. फोडणीवरच पदार्थाची संपूर्ण चव अवलंबून असते. फोडणी चांगली बसली तर पदार्थ चांगला लागतो आणि फोडणी बिघडली की संपूर्ण पदार्थाची चव बिघडते.
advertisement
2/5
फोडणीमध्ये मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, लसूण, कांदा या गोष्टी टाकल्या जातात. सामान्यपणे सगळ्यात आधी मोहरी आणि मग जिरं, कढीपत्ता. पण मग लसूण आणि कांदा दोन्ही ओलसर पदार्थ मग त्यात आधी काय टाकायचं असा प्रश्न पडतो.
advertisement
3/5
काही लोक लसूण फोडणीत करपते म्हणून आधी कांदा आणि मग लसूण टाकतात तर काही जण लसणीची फोडणीला चांगली चव यावी म्हणून आधी लसूण टाकतात. पण मग कोणती पद्धत योग्य? याबाबत शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं आहे.
advertisement
4/5
फोडणीत तुम्ही लसणीची पेस्ट टाकणार असाल तर मग आधी पेस्ट टाकून ती ब्राऊन रंगाची होईपर्यंत परता मग त्यात कांदा टाका. नाहीतर लसूण कच्चाच राहिल आणि तशीच चव पदार्थाला येईल.
advertisement
5/5
लसणीची पेस्ट किंवा अख्खा लसूण वापरण्यापेक्षा लसूण बारीक चिरून किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्याची पूर्ण पेस्ट करू नका, असा सल्ला शेफ विष्णू यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Kitchen Tips : लसूण की कांदा, फोडणीत पहिलं काय टाकायचं? क्रम चुकला तर बिघडते चव