कोल्हापुरी चटणीमुळंच असतो जेवणाला स्वाद, पण हे तिखट बनवण्यासाठी मिरची कोणती घ्यावी?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी ही एक प्रकारचा मसाल्याप्रमाणेच असते. ही बनवताना त्यामध्ये चटणी किंवा लाल तिखट आणि कांदा, लसूण यासह इतर घटक वापरले जातात.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> नावसोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती त्या पदार्थातील एका महत्त्वाच्या घटकामुळे. तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी होय. आता ही चटणी काय असते, कशी बनते? असे अनेक प्रश्न या चटणीबद्दल बऱ्याच जणांना असतात. मात्र चव, रंग आदी सर्वस्वी त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावर अवलंबून आहे.
advertisement
2/7
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी ही एक प्रकारचा मसाल्याप्रमाणेच असते. ही बनवताना त्यामध्ये चटणी किंवा लाल तिखट आणि कांदा, लसूण यासह इतर घटक वापरले जातात. मग सुरुवातीला कोरडी चटणी किंवा बुक्का बनवण्यासाठी काही ठराविक मिरच्याच वापरल्या जातात, असे विविध चटण्यांचे उत्पादक आणि विक्रेते असलेले विजया फुड्सचे मालक सुहास चव्हाण यांनी सांगितले आहे.
advertisement
3/7
वाळवलेल्या लाल मिरचीपासून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवली जाते. बाजार पेठेत बॅडगी, काश्मिरी अशा मिरच्या चटणीला आणि बनवण्यात येणाऱ्या पदार्थाला रंग येण्यासाठी वापरल्या जातात. तर तिखट होण्यासाठी गुंटूर, जवारी, लवंगी आदी अशा मिरच्या वापरल्या जातात. कोल्हापुरी चटणी म्हणजे फक्त तिखटपणा, भपका असा लोकांचा समज आहे. मात्र एक मसालेदार, मध्यम तिखट, रंगाला चांगली अशी कोल्हापूरी कांदा लसूण मसाला चटणीची वैशिष्ट्ये असतात, असे सुहास चव्हाण सांगतात.
advertisement
4/7
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी रंगाच्या आणि तिखटाच्या अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्यांपासून बुक्का तयार करून घेतला जातो. यामध्ये प्रत्येक चटणी उत्पादकाचे मिरच्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. मात्र सामान्यतः 2 किलो रंगाची उत्तम मिरची आणि 1 किलो तिखटाची उत्तम प्रतीची मिरची असे प्रमाण कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी अगदी योग्य ठरते,अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
advertisement
5/7
यंदा सगळीकडेच उत्पादन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठांमध्येही मिरचीची चांगली आवक आहे. यामध्ये बॅडगी मिरची 3,00 रुपयांपासून 9,00 रुपयांपर्यंत आहे. मात्र कमी किंमतीच्या मिरच्या हायब्रीड स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्याऐवजी केडीएल ही बॅडगी मिरची वापरणे कधीही योग्य असते.
advertisement
6/7
बॅडगी मिरचीचा दर सध्या 6,00 रुपयांपासून ते 8,00 रुपयांपर्यंत आहे. तसेच तिखटाची लवंगी, गुंटूर, जवारी आदी मिरची 3,00 रुपयांपासून ते 4,00 रुपयांपर्यंत मिळते. त्याचबरोबर सर्वात जास्त वापरली जाणारी संकेश्वरी मिरचीचा दर हा कमीत कमी 8,00 रुपयांपासून ते 1,200 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
7/7
दरम्यान योग्य प्रकारची स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत यावर देखील त्या चटणीची चव अवलंबून असते, असेही सुहास चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कोल्हापुरी चटणीमुळंच असतो जेवणाला स्वाद, पण हे तिखट बनवण्यासाठी मिरची कोणती घ्यावी?