TRENDING:

चहासोबत खा मॅगी अन् व्हेज सँडविच; पुण्यात मिळतीय भन्नाट थाळी पाहा PHOTOS

Last Updated:
वेगवेगळे पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतं. पुण्यात आता चहा थाळी मिळत आहे.
advertisement
1/6
चहासोबत खा मॅगी अन् व्हेज सँडविच; पुण्यात मिळतीय भन्नाट थाळी पाहा PHOTOS
वेगवेगळे पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या थाळ्या खाल्ल्या असतील. ज्यामध्ये व्हेज थाळी, नॉन व्हेज थाळी पण चहा थाळी कधी खाल्ली का नाही ना? तर <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> जे. एम रोड परिसरात असलेल्या छोटू टपरी वाला या कॅफेमध्ये चक्क चहा थाळी मिळते. ही थाळी 6 ते 7 प्रकारमध्ये मिळते.
advertisement
2/6
छोटू टपरी वाला कॅफेचे मालक सौरभ करमरकर आहेत. चहा थाळी विषयी माहिती देताना सौरभ करमरकर यांनी सांगितले की, आम्हाला याची कन्सेप्ट अशी वेगळी वाटली की यामध्ये वेगवेगळे पदार्थ समावेश करू शकतो. त्यामुळे यामध्ये 6 ते 7 प्रकारच्या थाळीला सुरुवात केली. एका व्यक्ती साठी, दोन लोकांसाठी, चार लोकांसाठी अशा वेगवेगळ्या पदार्थांनी तयार केलेली ही थाळी आहे.
advertisement
3/6
साधारण पणे थाळी म्हंटल की ग्राहकाला वाटत की मला पोट भरून जेवायला मिळणार आहे. थाळी आणि जेवण हे एकमेकांशी जोडलेले शब्द वाटतात. पण चहा थाळी ही वेगळी संकल्पना का आहे तर दिवसाच्या कोणत्या ही वेळेला ही चहा थाळी घेऊ शकता. म्हणजे सकाळी थाळी ही आपण घेऊ शकत नाही परंतु चहा थाळी कधी ही खाऊ शकता. त्यामुळे ऑल टाईमिंग सर्व्हिग अशी थाळी आहे, असं सौरभ करमरकर सांगतात.
advertisement
4/6
छोटू चहा थाळी ही एका माणसासाठी तयार केली आहे. त्यामध्ये चहा, मॅगी, बटर खारी, बन मस्का असतो. बडा चहा थाळीमध्ये दोन आल्याचे चहा, खारी बिस्कीट, मॅगी आणि व्हेज सँडविच मिळते. महाराजा चहा थाळी यामध्ये एक चहा केटल, बन मस्का, खारी स्पेशल मॅगी, व्हेज सँडविच मिळते.
advertisement
5/6
स्वीट अँड स्पाईसी थाळीमध्ये ओव्हर लोड चॉकलेट बन, स्पाईसी चिझ बन, सुजी मॅगी, बटर खारी मिळते. नाश्ता चहा थाळीमध्ये पोहे, उपमा, चहा केटल, बिस्कीट बन मस्का मिळतो. सँडविच थाळीमध्ये पनीर टिक्का, सँडविच, कॉर्न चिझ चिली सँडविच, स्पाईसी चिझ बन मस्का, चहा केटल मिळतो.
advertisement
6/6
या थाळीची किंमत जर बघितली तर 135 रुपयांपासून सुरुवात होते. आणि चहा थाळी सोबतच इतर पदार्थ देखील इथे बघायला मिळतात. त्याच प्रकारे या थाळी देखील अतिशय अप्रतिम अश्या आहेत. त्यामुळे सर्वच वयोगटातील लोक हे इथे खाण्यासाठी येत असतात, अशी माहितीही सौरभ करमरकर यांनी सांगितली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चहासोबत खा मॅगी अन् व्हेज सँडविच; पुण्यात मिळतीय भन्नाट थाळी पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल