Chef Kitchen Tips : पदार्थात मीठ नेमकं कधी टाकायचं? शेफने सांगितला परफेक्ट टायमिंग
- Published by:Priya Lad
Last Updated:
When Add Salt In Food Chef Kitchen Tips : सामान्यपणे सगळं फोडणीला घातलं किंवा पदार्थ शिजता शिजता मीठ टाकण्याची पद्धत आहे. बहुतेक लोक तेच करतात. पण प्रत्येक पदार्थात मीठ टाकण्याची वेगवेगळी वेळ असते.
advertisement
1/7

बहुतेक लोक मीठ कधी टाकायचं याचा विचारही करत नाही. आमटी किंवा भाजी फोडणीला घातली की त्यात लगेच मीठ टाकलं जातं. पण मीठ जो पदार्थाची फक्त चवच नाही तर रंग, पोत आणि शिजण्याची वेळ पूर्णपणे बदलू शकते.
advertisement
2/7
अनेकदा भाजी पाणी सोडते, डाळ शिजत नाही किंवा रस्सा बेचव लागतो आणि याचं कारण असतं फक्त मीठ चुकीच्या वेळेला टाकणं. मग आता नेमकं मीठ टाकायचं तर कधी?
advertisement
3/7
प्रत्येक पदार्थासाठी मीठ टाकण्याची वेळ वेगळी असते. काही वेळा मीठ आधी टाकतो, काही वेळा शेवटी तर काही वेळा पदार्थ शिजत असताना मधेच. आता कोणत्या पदार्थात कधी मीठ टाकायचं ते पाहुयात.
advertisement
4/7
डाळ, सूप असे लिक्विड म्हणजे द्रव, पातळ पदार्थ असतात त्यांच्यामध्ये शेवटी मीठ टाका. कारण पाणी असल्याने त्याची वाफ होते. हे पदार्थ आटतात. याच्यामध्ये सुरुवातीलाच मीठ टाकलं ते नंतर खारट होण्याची शक्यता असते.
advertisement
5/7
टोमॅटो, बटाटा, काही भाज्या यांच्यासारखे सॉलिड म्हणजे कडक फूड असतील तर तर सुरुवातीलाच मीठ टाका. जेणेकरून मीठ त्या पदार्थांमध्ये शोषलं जाईल.
advertisement
6/7
तर काही पदार्थ असे असतात ज्याच्यामध्ये ना आधी ना शेवटी तर ते पदार्थ खाण्याआधी त्यावर मीठ टाकली तर चांगली चव येते. जसं की फ्रेंच फ्राईझ आणि अंड्याचे पदार्थ.
advertisement
7/7
शेफ निरंजन यांनी एनएफसीआय हॉटेल मॅनेजमेन्ट अँड कल्नरी इन्स्टिट्युट या युट्युब चॅनेलवर याबाबत माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Chef Kitchen Tips : पदार्थात मीठ नेमकं कधी टाकायचं? शेफने सांगितला परफेक्ट टायमिंग