Best Foodie Destinations : स्ट्रीट फूडपासून सीफूडपर्यंत, भारतातील 8 शहरं जी फुडींच्या ड्रीम लिस्टमध्ये हवीच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Best Foodie Destinations : जर तुम्ही ‘फूडी ट्रॅव्हलर’ असाल आणि भारतात प्रवास करताना वेगवेगळ्या चवींचा अनुभव घ्यायचा असेल, तर आम्ही काही ठिकाणांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये नक्की असावीत.
advertisement
1/10

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि इथल्या खाद्यसंस्कृतीची ओळख जगभरात आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची खासियत असलेली डिश, मसाल्यांचा सुगंध, आणि चवीचा अप्रतिम मेळ यामुळे भारत हा खाद्यप्रेमींसाठी चांगलीच मेजवानी आहे आणि याचमुळे बहुतांश भारतीय हे फूडी आहेत. जर तुम्ही ‘फूडी ट्रॅव्हलर’ असाल आणि भारतात प्रवास करताना वेगवेगळ्या चवींचा अनुभव घ्यायचा असेल, तर आम्ही काही ठिकाणांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये नक्की असावीत.
advertisement
2/10
1. दिल्ली स्ट्रीट फूडचं हब आहेदिल्लीचं नाव घेतलं की लगेच लक्षात येतं ते चाट, गोलगप्पे, कबाब आणि पराठेवाली गली. जुनी दिल्लीतील चांदणी चौक हा स्ट्रीट फूड प्रेमींसाठी स्वर्ग आहे. इथे तुम्हाला छोले-भटुरे, दही भल्ले, मलाई लस्सी यांसारख्या चविष्ट डिशेस मिळतील.
advertisement
3/10
2. मुंबई वडापाव ते सीफूडमुंबईचं स्ट्रीट फूड जगप्रसिद्ध आहे. व्हडापाव, पावभाजी, भेलपुरी, आणि जूहू चोपाटीवरील शेवपूरी नक्की ट्राय करा. सीफूड रेस्टॉरंट्समध्ये बॉम्बिल फ्राय आणि प्रॉन्स करी ही चाखायलाच हवी. शिवाय मिसळ देखील खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
4/10
3. इंदूर खाणाऱ्यांसाठी मेजवानीइंदूरचं सराफा बाजार रात्री जागं होतं आणि तिथे पोहा-जलेबी, भुट्टे का किस, गराडू, आणि मालपुआसारखे असंख्य स्ट्रीट फूडचे ऑप्शन्स मिळतात. फुडी प्रवाशांसाठी इंदूर म्हणजे फूड पॅराडाईज आहे.
advertisement
5/10
4. लखनऊ नवाबी खाण्याचा अनुभवलखनऊ हे आपल्या नवाबी खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गलौटी कबाब, टुंडे कबाब, निहारी आणि शीरमल या डिशेस लखनौला भेट दिल्याशिवाय नक्की चाखायला हव्यात. येथील मुघलाई फ्लेव्हर तुमच्या जिभेवर अविस्मरणीय चव सोडेल.
advertisement
6/10
3. कोलकाता मिठाई आणि मच्छी प्रेमींसाठी बेस्टकोलकाता म्हटलं की रसगुल्ला आणि मिष्टी दोई ही मिठाई मनात येते. याशिवाय इथलं फिश करी-राइस आणि पुचका (पाणीपुरी) खायला विसरू नका. कोलकात्याचं स्ट्रीट फूडही देशभर प्रसिद्ध आहे.
advertisement
7/10
4. अमृतसरला पंजाबी तडकाअमृतसरचं प्रसिद्ध ‘अमृतसरी कुल्चा’ आणि लस्सी खाल्ल्याशिवाय पंजाबचा फूड टूर अपूर्ण आहे. सुवर्ण मंदिराजवळील लंगरमध्ये दिलं जाणारं साधं पण स्वादिष्ट जेवणही नक्की अनुभवावं.
advertisement
8/10
5. गोवा सीफूड आणि पोर्तुगीज फ्लेव्हरगोवा हे सीफूड लव्हर्ससाठी स्वर्ग आहे. प्रॉन्स करी, गोअन फिश थाळी, बेबिंका सारखी मिठाई आणि फेणी यांचा आनंद घेतल्याशिवाय गोव्याची सफर पूर्ण होत नाही.
advertisement
9/10
6.हैदराबाद बिर्याणीचं राजधानीहैदराबादची बिर्याणी जगभर प्रसिद्ध आहे. इथली दम बिर्याणी, हलीम आणि मुघलाई मिठाई फूडींसाठी स्वर्गीय अनुभव देतात.
advertisement
10/10
भारताच्या प्रत्येक शहरात तुम्हाला एक वेगळी चव, वेगळं खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडतं. फूडी ट्रॅव्हलर्सनी या ठिकाणांना भेट देऊन भारताच्या विविध चवींचा आनंद नक्की घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Best Foodie Destinations : स्ट्रीट फूडपासून सीफूडपर्यंत, भारतातील 8 शहरं जी फुडींच्या ड्रीम लिस्टमध्ये हवीच